भारत - जलसंपत्ती व सागरसंपत्ती
भारतात ठरावीक काळात पाऊस पडतो, परंतु सर्वच भागांत तो सारखा पडत नाही. काही भागांत खूप पाऊसपडतो, तर काही ठिकाणी अगदी कमी पाऊस पडतो.
पावसाचे पाणी भूपृष्ठावर नव्या, तलाव, सरोवरे इत्यादींद्वारे आपल्याला मिळत असते. यालाच भूपृष्ठीय
जल असे म्हणतात. नदीचे बरेचसे पाणी वाहत जाऊन
समुद्रास मिळते. पावसाचे काही पाणी जमिनीमध्ये मुरते व ते भूपृष्ठाखालून वाहते किंवा साठते. या भूपृष्ठाखालील पाण्यास भूजल असे म्हणतात.

भारतातील पर्जन्याच्या असमान वितरणामुळे अनेकवेळा उत्तरेकडील ब्रम्हपुत्रा, कोसी, गंडक इत्यादी नद्यांना पूर येतात. चेरापुंजी, मौसिनराम या ठिकाणी सर्वांत जास्त पाऊस पडतो, तथापि राजस्थान, दक्षिण भारतीय
पठारावरील पश्चिम घाटाच्या पूर्वेस अत्यंत कमी पाऊस पडतो.
त्यामुळे या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. भारतातील जलसंपत्तीचा वापर मुख्यत्वे नद्या,
सरोवरे, नैसर्गिक व मानवनिर्मित तलाव, विहिरी व विंधन विहिरींद्वारे केला जातो.
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात नक्ष्यांना बारा महिने पाणी असते. तेथे नद्यांच्या पाण्याचा वापर मोठ्या
प्रमाणात केला जातो. दक्षिणेकडील पठारावर नया मर्यादित काळात वाहतात. पावसाळ्यात पडणारे पाणी
नद्यांवर धरणे बांधून अडवले जाते. कालव्यांद्वारे दूरच्या प्रदेशांपर्यंत जलसिंचनासाठी पाणीपुरवठा करून पाण्याची गरज भागवण्यात येते.

महानदीवरील हिराकूड धरण, गोदावरीवरील जायकवाडी प्रकल्प, दामोदर नदीवरील धरणे, सतलज नदीवरील भाक्रा नानगल प्रकल्प व त्यातून पाणीपुरवठा करणारा राजस्थान कालवा ही काही ठळक उदाहरणे आहेत. पाण्याचा वापर जलसिंचनाबरोबर जलविद्युत निर्मिती, मासेमारी, पर्यटन इत्यासाठी सुद्धा
होतो.
पाणीटंचाई असलेल्या व पर्जन्यछायेच्या प्रदेशात भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. विहिरी,
विंधन विहिरी निर्माण करून पाण्याची सोय केली जाते.दक्षिण भारतात विशेषतः कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांतील पठारी भागात अछिद्र खडक असल्यामुळे तलाव बांधून पाणी साठवून त्याचा वापर केला जातो. पाण्याचा अतिवापर, पाण्याचे प्रदूषण, भूजल पातळी कमी होणे इत्यादी जलसंपत्ती वापराच्या समस्या आहेत.
म्हणून जलसंपत्तीचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे.

सागरसंपत्ती
भारतीय मुख्य भूमीच्या तीन बाजू सागराने वेढलेल्या
आहेत. सागरजलात, सागरतळावर व सागरतळाखाली
विविध नैसर्गिक संपत्तीचे साठे आहेत. समुद्र व महासागरातून प्राप्त होणाच्या या संपत्तीस आपण सागरसंपत्ती म्हणतो. विविध प्रकारचे जलचर, प्रवाळ व मोती सागरात
सापडतात. सागरतळाशी सापडणारी शुद्ध स्वरूपातील खनिजे, सागरतळाखाली उपलब्ध असलेले नैसर्गिक वायू व खनिज तेलाचे साठे, सागराच्या पाण्यापासून प्राप्त होणारे मीठ ही सर्व सागरसंपत्ती होय.
सागराचे पाणी खारट असते. या पाण्यापासून मीठ तयार केले जाते.
भारताच्या पश्चिम किना-यावर अनेक ठिकाणी मिठागरे आहेत. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक
राज्यांत मोठ्या प्रमाणावर मीठ, तयार करतात. पश्चिम भारतीय किनारपट्टीजवळील समुद्रतळ उथळ
आहे. या भागात पाणी उबदार असते. या पाण्यात अनेक प्रकारचे मासे व सागरी जीव मोठ्या संख्येने आढळतात.

माशांचा उपयोग अन्न, खत व औषध निर्मितीसाठी होतो.कच्छच्या किना-यापासून ते सुंदरबनपर्यंत भारतीय सागरीक्षेत्रात मासेमारी व्यवसाय चालतो. सागरात काही सजीवांपासून प्रवाळ व मोती तयार होतात. त्यांपासूनऔषधे व दागिने तयार करतात. भारताच्या दक्षिणेकडील मन्नारचे आखात त्यासाठी प्रसिद्ध आहे.
समुद्रतळाखाली नैसर्गिक वायू व खनिज तेल काही ठिकाणी सापडते. मुंबईजवळील अरबी समुद्रात मुंबई हाय येथे असे साठे आहेत. तेथे तेल व वायू विहिरी आहेत.
केरळच्या किनारी भागात थोरियम हे अणुऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असलेले खनिज सापडते. ओडिशा व महाराष्ट्राच्या सागरी भागातसुद्धा काही खनिजे आढळतात.
नद्यांनी वाहून आणलेल्या गाळातील खनिजांचे सागरी किना-यावर तसेच सागरतळाशी संचयन होते. ही संचयित खनिजे ब-याच अंशी शुद्ध स्वरूपात असतात.
पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे ७१% भाग सागराने व्यापलेला आहे. मानवाची भविष्यातील साधनसंपत्ती
सागरातून प्राप्त होऊ शकते. सागरातील जलचर, खनिजसंपत्ती व वनस्पती यांचा वापर भविष्यात वाढेल.
त्यामुळे नियोजन करून सागरसंपत्तीचा वापर करणे आवश्यक आहे.