राज्यशासन
राज्यशासन महाराष्ट्राचे विधिमंडळ : महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषद ही दोन सभागृहे आहेत. विधानसभा : महाराष्ट्र विधिमंडळाचे हे पहिले सभागृह असून याची सभासद संख्या २८८ आहे. अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल, तर राज्यपाल त्या समाजाचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नेमतात. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी काही जागा राखीव असतात. निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे मतदारसंघात विभाजन केले जाते. प्रत्येक मतदार संघातून एक प्रतिनिधी निवडला जातो. विधानसभेची मुदत पाच वर्षांची असते. अपवादात्मक परिस्थितीत विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात. वयाची २५ वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याचे महाराष्ट्रात वास्तव्य असल्यास विधानसभेची निवडणूक लढवता येते. विधानसभेचे अध्यक्ष : विधानसभेचे कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते. निवडणुकीनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या विधानसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष व एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावे यासाठी कार्यक्र...