कर्ता कर्म प्रत्यक्ष कर्म व अप्रत्यक्ष कर्म विधान पूरक

१) कर्ता २) कर्म ३) प्रत्यक्ष कर्म व अप्रत्यक्ष कर्म ४) विधान पूरक

१) कर्ता - वाक्यात क्रियापदाने दारवविलेली क्रिया करणाऱ्याला कर्ता असे म्हणतात.
उदा.- कबूतर उडते. ह्यात उडणारे म्हणजे उडण्याची क्रिया करणारे कबूतर आहे. म्हणून “कबूतर” त्या क्रियापदाचा कर्ता आहे.


२) कर्म - क्रियापदाने दारवविलेली क्रिया ज्याच्यावर घडते, ते कर्म होय.
उदा.- अक्षय आंबा रवातो. येथे रवाण्याची क्रिया करणारा कोण? अक्षय” कर्ता. रवाण्याची क्रिया कोणावर घडली? आंबा" या शब्दावर घडली म्हणून (आंबा हा शब्द त्या क्रियापदाचे कर्म आहे.


३) प्रत्यक्ष कर्म व अप्रत्यक्ष कर्म - काही वेळा एकाच वाक्यात क्रियापदाला वस्तुवाचक व व्यक्तिवाचक अशी दोन कर्मे असतात.
त्याना अनुक्रमे प्रत्यक्ष कर्म व अप्रत्यक्ष कर्म असे म्हणतात.
उदा. सलोरवने मिलापला गोष्ट सांगितली. या वाक्यात गोष्ट हे प्रत्यक्ष कर्म व मिलापला हे अप्रत्यक्ष कर्म होय.


४) विघान पुरक - जेव्हा एरवादे क्रियापद अकर्मक असूनही त्याने केलेल्या विघानाची पूर्तता करण्यासाठी एरवाद्या शब्दाची आवश्यकता असते. तेव्हा त्या शब्दाला “विघानप्रक” म्हणतात.

उदा. मिलाप कलाकार आहे. स्नेहल कवयित्री आहे. या दोन्ही वाक्यात “आहे” हे क्रियापद अकर्मक आहे. परंतु विघानांची पुर्तता “कलाकार” व “कवयित्री" या शब्दांनी झाली आहे. म्हणून “कलाकार” व “कवयित्री" हे शब्द विघान प्रक आहेत.

Popular posts from this blog

पृथ्वीची आवरणे

महाराष्ट्रातील नद्या

केंद्रीय कार्यकारी मंडळ