Types Of Sentences
वाक्यांचे प्रकार (Types of Sentences)
- आपण बोलताना किंवा लिहिताना शब्दांचा उपयोग करतो. साधारण: या शब्दांचा समूहात उपयोग केला जातो.
- उदा. Little Jack Horner sat in a corner.
- अशा प्रकारच्या पूर्ण अर्थबोध होणार्या शब्दसमुहाला वाक्य असे म्हणतात.
- वाक्य 4 प्रकारची असतात.
1. अशी वाक्ये जी वक्तव्य करतात किंवा निश्चित विधान करतात.
उदा. Humpty Dumpty sat on a wall.
2. अशी वाक्ये ज्यातून प्रश्न विचारले जातात.
उदा. Where do you live?
3. अशी वाक्ये ज्यातून आज्ञा, विनंती किंवा विनवणी व्यक्त करतात.
उदा.
- Be quiet.
- Have mercy upon us.
4. अशी वाक्ये जी उत्कट भावना व्यक्त करतात.
उदा.
- How cold the night is!
- What a shame!
- वक्तव्य करणार्या किंवा निश्चित विधान करणार्या वाक्याला विधानार्थी (Declarative) किंवा निश्चयात्मक सम (Assertive) वाक्य म्हणतात.
- प्रश्न विचारणार्या वाक्याला प्रश्नार्थक (Interrogative) वाक्य म्हणतात.
- आज्ञा किंवा विनंती व्यक्त करणार्या आज्ञार्थी वाक्य (Imperative) म्हणतात.
- उत्कट भावना व्यक्त करणार्या वाक्याला उदगारवाचक वाक्य म्हणतात. (Exclamatory)