विकारी शब्दांच्या जाती
विकारी शब्दांच्या जाती
आ) शब्दांच्या जाती - सर्वनाम
सर्वनामे - स्वत:चा असा काही विशेष अर्थ नसून सर्व नामांच्या बद्दल उपयोगात येणारा जो विकारी शब्द त्यास सर्वनाम असे म्हणतात.सर्वनामाचे अर्थदृष्टया प्रकार सहा आहेत -
(आ) पुरुषवाचक सर्वनाम (ब) दर्शक सर्वनाम (क) संबंधी सर्वनाम
(ड) प्रश्नार्थक सर्वनाम (इ) सामान्य किंवा अनिश्चित सर्ववास (फ) आत्मवाचक सर्वनाम.
मराठीत एकंदर सर्वनामे नऊच आहेत -
मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः
आ) पुरुष वाचक सर्वनाम - तीन प्रकार आहेत.
१) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
२) दृवितीय पुरूषवाचक सर्वनाम
3) तृतीय पुरूषवाचक सर्वनाम.
१) प्रथम पुरूषवाचक सर्वनाम - बोलणाऱ्या व्यक्तीने स्वत:विषयी वापरळेली सर्वनामे
उदा. - मी, आम्ही, आपण, स्वत: व त्यांची विभक्ती प्रत्यये.
२) द्वितीय पुरूषवाचक सर्वनाम - बोलणारी व्यक्ती ज्यांच्याशी बोलते, त्यांच्या विषयी वापरलेली सर्वनामे.
उदा. - तू. तुम्ही, आपण, स्वत: व त्यांची विभक्ती प्रत्यये.
३) तृतीय पुरूषवाचक सर्वनाम - बोलणारी व्यक्ती ज्यांच्या विषयी बोलते त्यांच्या विषयी वापरलेली सर्वनामे.
उदा. - तो, ती, ते. त्या, ती व त्यांची विभक्ती प्रत्यये.
ब) दर्शक सर्वनाम - विशेषतः वस्तू जवळ असल्यास लिंग भेदाप्रमाणे (हा, ही, हे, ह्या; ही सर्वनामे वापरतो. पण वस्तू दूर
असल्यास तो, ती, ते. त्या, € ही सर्वनामे वापरतो. ही सर्वनामे वापरताना आपण ते पदार्थ दर्शवितो किंवा दारववितो म्हणून
त्याना दर्शक सर्वनामे असे म्हणतात.
क) संबंधी सर्वनामे - “जो, जी, जे, ज्या, ह्या सर्वनामांचा संबंध त्याच वाक्यात पुढे येणाऱ्या तो, ती, ते. त्या" या
दर्शक सर्वनामाशी असतो. म्हणून “जो, जी, जे, ज्या या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात.
उदा - १) जो अभ्यास करतो तो परीक्षेत पास होतो.
२) जे चकाकते ते सारे सोने नसते.
3) जी कविता लिहिते ती कवयित्री होते.
ड) प्रश्नार्थक सर्वनाम - वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरलेली सर्वनामे. कोण, काय, कोणास, कोणाचा, कोणी यामुळे प्रश्न विचारता येतो. म्हणून ही प्रश्नार्थक सर्वनामे होय.
उदा - डब्यात काय आहे ? दरवाजात कोण आहे ? हे काम कोणी केले ? हे पुस्तक कोणाचे आहे ? वही कोणास देणार
आहेस ?
ई) सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम - प्रश्नार्थक वाक््याव्यतिरिक्त इतर ठिकाणी वापरलेली कोण, कोणास, काय ही सर्वनामे कोणत्या नामाबद्दला वापरलेली आहेत हे निश्चित सांगता येत नाही. म्हणून अशा “कोण व कार्य” या सर्वनामांना अनिश्चित किंवा सामान्य
सर्वनामे म्हणतात.
उदा - मिलापच्या पिशवीत काय आहे ते पाहूया. तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, स्नेहलचे उत्तर तयार असते. आंबा कोणी रवाल्ला ते माहीत नाही.
फ) आत्मवाचक सर्वनाम - स्वत: व आपण ही सर्वनामे.
उदा. - मी स्वतः अभ्यास करणार. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही. आपले काम आपणच करावे. तुम्ही स्वत: चहा घ्या.
त्यानी स्वतः मिळापला बोलावले. तुम्ही आपल्या घरी जा. त्यानी आपले पुस्तक बदलले आहे.
“आपण? ह्या सर्वनामाचा प्रथम पुरुषवाचक व दितीय पुरुषवाचक याप्रमाणे उपयोग करणे व आत्मवाचक याप्रमाणे उपयोग करणे
यात फरक आहे. जेव्हा ते (आम्ही किंवा तुम्ही” या अर्थाने येते, तेव्हा ते अनुक्रमे प्रथम व दरितीय पुरुषवाचक असते. व स्वतः
या अर्थी येते तेव्हा ते आत्मवाचक असते.
पुरुषवाचक (आपण? व आत्मवाचक” आपण” यातील फरक
पुरुषवाचक आपण आत्मवाचक आपण
१) प्रथम व दितीय पुरुषीच येते, १) सर्व पुरुषी येते.
२) आदरार्थी अनेकवचनी येते, २) दोन्ही वचनी येते.
3) तुम्ही व आम्ही याच अर्थी येते, 3) स्वतः याच अर्थी येते.
४) कर्ता, कर्म होऊ शकते, ४) कर्ता. कर्म कधी ही होऊ शकत नाही.
स्वाध्याय : रवालील वाक्यातील ठळक शब्द नामे आहेत की सर्वनामे आहेत ते सांगा :
१) गमतीदार पोशासव केलेला एक माणूस रिंगणात आला. तो फार ठेंगणा होता.
२) नंतर काही हत्ती रिंगणात आले. ते वर्तुळाकार फिरू लागले.
इ) शब्दांच्या जाती - विशेषण
विशेषण - नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. म्हणजे नामांचा कोणत्या तरी प्रकारचा गुण किंवा वैशिष्टय दारवविणारा जो विकारी शब्द त्याला विशेषण म्हणतात. विशेषणे ही कशाचीही नावे नसतात. विशेषणे एकाकी कधीच येऊ शकत नाहीत. कधीकधी नाम नसताना विशेषण एकाकी येते. तेव्हा तेच नाम होते. विशेषण हे नामाला जोडून नामाच्या आधी येते.
उदा - गरिबास श्रीमंत व्हावेसे वाटते. येथे गरीब हा शब्द नामाप्रमाणे उपयोगात आलेला आहे. म्हणून ते विशेषण नसून नामच आहे.
विशेषणे चार प्रकारची असतात.
आ) गुणवाचक विशेषण ब) संरव्यावाचक विशेषण
क) सार्वनामिक विशेषण ड) धातुसाधित विशेषण.
(टीप -
अधि-विशेषण / विधि-विशेषण
मराठी वाक्यामध्ये पुष्कळ वेळा विशेषण नामाच्या पुर्वी येते. ह्या वाक्याच्या पूर्वी येणाऱ्या विशेषणास नुसते विशेषण किंवा अधि-विशेषण म्हणतात. पण नामाचे नंतर विधेयाची पूर्तता करण्यासाठी येणार्या विशेषणास विधि-विशेषण म्हणतात.
उदा - (१) "पण मुलगी हुशार आहे” येथे (हुशार हे विधि-विशेषण आहे - विशेषणावर विशेष जोर देण्याची आवश्यकता
असल्यास विशेषणे नामाच्या नंतर येतात.
(२) “हुशार मुलगी लक्ष देउन अभ्यास करते” येथे (हुशार? हे अधि-विशेषण आहे)
आ) गुणवाचक विशेषण - नामांचे गुण किंवा विशेष दारवविणाऱ्या अशा विशेषणांना “गुणवाचक विशेषणे” म्हणतात.
उदा. - चांगला मुलगा, पांढरी टोपी, कडू कारले, पिवळी केळी.
चांगला, पांढरी, कडू, पिवळी ही विशेषणे त्यांच्या पुढे येणारी नामे कशा प्रकारची आहेत हे सांगतात.
ब) संस्व्यावाचक विशेषण - ही विशेषणे नामाची संरव्या दर्शवितात.
त्यात तीन प्रकार आहेत.
१) गणनावाचक संरव्या विशेषण
२) क्रमवाचक संरव्या विशेषण
3) आवृत्तीवाचक संरव्या विशेषण.
१) गणनावाचक संरव्या विशेषण - काही गणनावाचक संरव्या विशेषणे निश्चित
संरव्या, अनिश्चित संरव्या किंवा परिमाणही दारववितात.
उदा. - वीस मुले, पंचवीस पुस्तके, दहा फळे, पाच पाने. यात वीस, पंचवीस,
दहा, पाच ही निश्चित संरव्या होय.
काही मुले, थोडे तांदूळ, पुष्कळ मुंग्या, यात काही, थोडी, पुष्कळ ही अनिश्चित संरव्या होय.
२) क्रमवाचक संरव्या विशेषण - यात वस्तूंचा क्रम दारवविला जातो.
उदा. - पहिला क्रमांक, चोथा मुलगा, आठवा बाक. यात पहिला, चोथा,
आठवा ही क्रमवाचक संरव्या विशेषण होय.
३) आवृत्तीवाचक संरव्या विशेषण - यात संरव्येची किती आवृत्ती झाली हे कळते.
उदा. - दुप्पट मोठा, तिप्पट उंची, दसपट पुस्तके. यात दुप्पट, तिप्पट, दसपट
ही आवत्तीवाचक संरव्या विशेषणे होय.
संरव्यावाचक विशेषण उदा.
अंक गणनावाचक क्रमवाचक आवृत्तीवाचक
१ एक पहिला एकपट
२ दोन दुसरा दुप्पट
3 तीन तिसरा तिप्प्ट
छं चार चोथा चोपट
षु पाच पाचवा पाचपट इ.
क) सार्वनामिक विशेषण - सर्वनासापुढे त्याची नामे लगेच आलेली असतात. अशी ही सर्वनामे विशेषणे होतात. सर्वनामापासून
बनलेल्या अशा विशेषणांना सार्वचामिक विशेषणे म्हणतात.
टीप - हा कागद, ते फळ, ती चिमणी; - हा, ते. ती, ही सर्वनामे वाटतील, परंतु ती या ठिकाणी कागद, फळ, चिमणी या नामांची विशेषणे म्हणून आलेली आहेत. सर्वनाम नामाबद्दल वापरतात. इथे ती नामाबरोबर आहेत हे ध्यानात ध्यावे.
उदा. - माझे घर. तुझी शाळा, त्यांचे मित्र, येथे माझे, तुझी, त्यांचे ही सार्वनामगिक विशेषणे होय.
ड) धातुसाधित विशेषण - धातू पासून कृदंत रुपे बनतात. काही क्ृृदंत रुपांचा वाक्यात विशेषणासाररवा उपयोग होतो. त्याना
धातूसाधित विशेषणे म्हणतात.
उदा - त्याचा चेहरा बोलका वाटतो. (बोळणे) आम्ही सिंहगडळला चालत चालत गेलो. (वाळणे). कोकिळा गात आहे. (गाणे) बोलका, चालत, गात ही धातुसाधित विशेषणे होय.
टीप - कृृदंत - धातुपासून तयार झालेले रुप, यालाच कृदंत म्हणतात. गा धातूपासून गाणे, गान, गाता, गाताना, गाऊ, गाऊन,गाणारा अशी कृदंत रुपे तयार होतात.
१) नामापासून विशेषणे :
१) आनंद - आनंदी २) इतिहास - ऐतिहासिक
3) इच्छा - इच्छित, ऐच्छिक ४) उपयोग - उपयोगी
५) उत्साह - उत्साही ६) ऐट - ऐटबाज, ऐटदार
७) केस - केसाळ ८) कागद - कागदी
९) कुटुंब - कोटुंबिक १०) रर्वर्च - र्वर्चिक
११) गर्व - गर्वष्टि १२) गुण - गुणवान
१३) चव - चविष्ट १४) चैन - वेनी
१५) जल - जलमय १६) जग - जागतिक
१७) जोर - जोरदार १८) डोंगर - डोंगराळ
१९) तर्हा - तऱ्हेवाईक २०) तोंड - तोंडाळ
२१) दया - दयावंत २२) दगड - दगडी
२३) दुःरव - दुःरवी २४) दोष - दोषी
२५) धूर - छुरकट २६) धर्म - धार्मिक
२७) निसर्ग - नेसर्गिक २८) प्रकाश - प्रकाशित
२९) पराक्रम - पराक्रमी 3०) पदृधत - पद्धतशीर
3१) पुस्तक - पुस्तकी 3२) बहुमत - बहुमतवादी
३3) बंड - बंडरवोर 3४) बुद्धी - बुद्धिमान, बोद्धिक
3३५) भारत - भारतीय 3६) भीती - भीतीदायक
3७) मजा - मजेशीर 3८) मानव - मानवी
3९) यंत्र - यांत्रिक ४०) यश - यशस्वी
४१) रंग - रंगीत ४२) राग - रागीट
४5) राष्ट - राष्ट्रीय ४४) लोरवंड - ठोरकंडी
४५) लाज - लाजाळू ४६) लाकूड - लाकडी
४७) वजन - वजनी ४८) वाळवंट - वळवंटी
४९) व्यवहार - व्यवहारी ५०) वर्ष - वार्षिक
५१) व्यापार - व्यापारी ५२) विनय - विनयी, विनयशील
५३) शहर - शहरी ५४) शक्ती - शाकक्क्तिमान
५५) शास - शास्त्रीय ५६) शाकाहार - शाकाहारी
५७) शोर्य - शोर्यशाळली ५८) शिक्षण - शेक्षणिक
५९) सरकार - सरकारी ६०) समाज - सामाजिक
६१) सर्वांग - सर्वागीण ६२) सागर - सागरी
६3) सुरव - सुरवी ६४) सूत - सुती
६५) सुगंध - सुगंधी ६६) हवा - हवाई
६७) हास्य - हास्यास्पद ६८) होस - होशी
६९) ज्ञान - ज्ञानी
२) शब्दापासून भाववाचक नामे -
विशेषणांना ई, य, ता, त्व, पण, पणा, गिरी ही प्रत्यये लागून भाववाचक नामे तयार होतात.१) अनुकूल - अनुकूलता २) अपूर्व - अपूर्वाई
3) आवश्यक - आवश्यकता ४) उत्सुक - उत्सुकता
५) उंच - उंची ६) उदास - औदासीन्य, ओदास्य
७) उदार - उदारपणा, ओदार्य ८) उष्ण - उष्णता
९) कणरवर - कणरवरपणा १०) करुण - कारुण्य
११) कुशल - कोशल्य १२) कोमळ - कोमलता
१३) रवंबीर - रवंबीरपणा १४) खिवेन्न - रिवेन्नता
१५) रवोल - स्वोली १६) गुन्हेगार - गुन्हेगारी
१७) गुलाम - गुलामगिरी १८) गोड - गोडी, गोडवा
१९) गरीब - गरिबी २०) गोंडस - गोंडसपणा
२१) चपळ - वपळाई २२) चतुर - चातुर्य, चतुरपणा
२3) वांगला - चांगुलपणा २४) जाड - जाडी
२५) जुना - जुनेपणा २६) तृप्त - तृप्ती
२७) तीव्र - तीव्रता २८) थंड - थंडी
२९) दयाळू - दयाळूपणा 3०) दीन - दैन्य
3१) दुर्बल - दोंबल्य 3२) देव - देवत्व, देवपण
33) धीट - धिटाई, धीटपण 3४) नम्र - नम्रता
3५) नवीन - नाविन्य 3६) निळसर ॒ - निळसरपणा
3७) निपुण - नेपुण्य 3८) निर्भय - निर्भयता
3९) प्रमुरव - प्रामुरव्य ४०) प्रसिद्ध - प्रसिद्धी
४१) प्रवित्र - पावित्र्य ४२) प्रतिकूल - प्रतिकूलता
४३) प्रवीण - प्राविण्य ४४) पोष्टिक - पोष्टिकता
४५) बहादूर - बहादुरी ४६) भव्य - भव्यता
४७) भागीदार - भागीदारी ४८) भीषण - भीषणता
४९) मऊ - मऊपणा ५०) मंगळ - मांगल्य
५१) मालक - मालकी ५२) माणूस - माणूसकी
५३) मित्र - मेत्री, मित्रत्व ५४) म्हातारा - म्हातारपण
५५) मूर्र्व - मूर्यरगपपणा ५६) मोठा - मोठेपणा
५७) योग्य - योग्यता ५८) लायक - लायकी
५९) लहान - लहानपण, लहानपणा ६०) लुच्चा - ल्च्चेगिरी
६१) रुंद - रुंदी ६२) वद्ध - वार्धक्य
६3) विविध - विविधता ६४) विशिष्ट - वैशिष्ट्य
६५) शहाणा - शहाणपण, शहाणपणा ६६) श्रीमंत - श्रीमंती
६७) शूर - शोर्य ६८) श्रेष्ठ - श्रैष्ठत्व, श्रेष्ठता
६९) सजीव - सजीवता ७०) शांत - शांतता
७१) शत्रू - शत्रुत्व ७२) संपन्न - संपन्नता
७३) समृद्ध - समृद्धता ७४) सपाट - सपाटी
ई) शब्दांच्या जाती - क्रियापद
क्रियापद - क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. क्रियेचा काळ आणि विशेष अर्थ यांचा पूर्ण बोध होतो. तसेच ह्या क्रियावाचक शब्दामुळे वाक्ये पुरी होतात. म्हणून ह्या विकारी शब्दास क्रियापद असे म्हणतात.
क्रियापदाचे एकूण सहा प्रकार आहेत -
(आ) सकर्मक क्रियापद (ब) अकर्मक क्रियापद
(क) संयुक्त क्रियापद (ड) सहाय्यक क्रियापद
(ई). प्रयोजक क्रियापद (फ) शक्य क्रियापद
(आ) सकर्मक क्रियापद - ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते, त्यास सकर्मक क्रियापद म्हणतात.
उदा - रामू भाजी विकतो - विकणारा कोण ? रामू. म्हणून रामू हा कर्ता. विकण्याची क्रिया कोणावर घडते ? भाजी या शब्दावर, म्हणून भाजी हे कर्म. रामू विकतो या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्याला पूर्ण होण्यास “भाजी” या कर्माची जरुरी आहे. म्हणून “विकतो” हे सकर्मक क्रियापद आहे.
उदा - १) मिलाप चित्र काढतो. २) सलोरव अभ्यास करतो. 3) स्नेहल कविता रचते. वरील तीन वाक्यात अनुक्रमे चित्र,अभ्यास, कविता ही कर्मे असल्याने काढतो, करतो व रचते ही सकर्मक क्रियापदे होय.
ब) अकर्मक क्रियापद - ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी नसते, त्यास अकर्मक क्रियापद म्हणतात.
उदा - १) कावळा ओरडतो. २) नेहा झोपते. 3) स्नेहा रवेळते.
वरील वाक्यात ओरडतो कोण ? कावळा. म्हणून कावळा कर्ता. कर्म नाही.
झोपते कोण ? नेहा. म्हणून नेहा कर्ता. कर्म नाही व
रवेळते कोण ? स्नेहा, म्हणून स्नेहा कर्ता, कर्म नाही.
वरील वाक्यातील ओरडतो, झोपते, रवेळते ही अकर्मक क्रियापदे आहेत. यातील ओरडण्याची, झोपण्याची व रवेळण्याची क्रिया दुसर्या कोणावरही घडत नाही. या क्रियापदाना कर्माची जरुरी नसते. म्हणून या क्रियापदांना अकर्मक क्रियापदे म्हणतात.
(क) संयुक्त क्रियापद व (ड) सहायक क्रियापद - कधी कधी क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुरव्य क्रिया दर्शविणाऱ्या रुपाला
जोडून दुसर्या क्रियापदाचा उपयोग करावा लागतो. या दोन्ही क्रियापदांच्या संयोगाने जे क्रियापद तयार होते त्याला संयुक्त
क्रियापद म्हणतात. तसेच त्या मुरव्य क्रिया दर्शविणाऱ्या रुपाला जोडून जे दुसरे क्रियापद येते, त्याला सहायक क्रियापद किंवा सहायकारी क्रियापद म्हणतात.
मुरव्य क्रिया दर्शविणारे रूप > सहायक क्रियापद > संयुक्त क्रियापद
उदा.- कावळा झाडावर ओरडत आहे. या वाक्यात (ओरडत या धातुसाधिताला आहे" या क्रियापदाने सहाय केले आहे. पण ह्या संयुक्त क्रियापदाने एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे.
कृदंत - मुरव्य धातूचे रूप अपूर्ण - क्रिया दर्शक म्हणजे धातुसाधित असून सहायक धातूचे रूप मात्र पुर्ण क्रियादर्शक म्हणजे क्रियापद असते. व या दोन्हीमुळे संयुक्त क्रियापद होते.
उदा.- नेहा गात आहे. ह्या वाक्यात “गात हे क्रियापद नव्हे, “गा' या धातृला “त * हा
प्रत्यय लागून “गात” असा क्रियावाचक शब्द तयार झालेला आहे, पण या “गात” शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून हा शब्द क्रियापद नाही. धातूला प्रत्यय लागून क्रिया अपुरी दारवविणाऱ्या शब्दाला “धातुसाधित” किंवा कृदंत” म्हणतात.
“गा” या धातूपासून गात, गाताना, गाता, गाऊ, गाणारा ही धातुसाधित रुपे तयार होतात.
ई). प्रयोजक क्रियापद - जेव्हा कोणीतरी एर्वादी क्रिया दुसऱ्याकडून करवितो, तेव्हा ती क्रिया दारवविणारे क्रियापद हे 'प्रयोजक”क्रियापद असते.
उदा. नेहा बहिणीला हसविते.
ह्या वाक्यात नेहा स्वत: हसत नसून हसण्याची क्रिया बहिणीकडून करविते. तसेच पाडतो,रडविते, आणवितो, करवितो, ही प्रयोजक क्रियापदे होय.
फ) शक्य क्रियापद - जेव्हा एरवाद्या क्रियापदावरुन कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य आहे असा बोध होतो.अशा क्रियापदांना “शक्य क्रियापदे” म्हणतात.
उदा. त्याला आता खूप चालवते. मळा आता दुकानापर्यंत जाववते.
चालवते व जाववते ही शक्य क्रियापदे होय. कारण येथे क्रियेवरून शक्यतेचा किंवा समर्थतेचा अर्थ कळत असल्यामुळे क्रिया चालवणारा कोण ? किंवा जाणारा कोण ? असे विचारण्याची अपेक्षा नसून चालण्याची किंवा जाण्याची शक्ती असणारे कोण ? ह्या अर्थाच्या प्रश्नानेच अपेक्षित व योग्य उत्तर निघते.
स्वाध्याय - रवालील वाक्यातील क्रियापदे ओळरवा
१) पाऊस पडला. २) वारा वाहतो. 3) वीज चमकते. ४) मिलाप पुस्तक वाचतो. ५) नेहा हसते. ६) कोमल बोलते.