महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम-मध्य भागात आहे. गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ,
आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा ही राज्ये आणि दादरा आणि नगर हवेली हे संघराज्य क्षेत्र आपल्या राज्याच्या
शेजारी आहेत. 



आपल्या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. भारतातील राज्ये क्षेत्रफळाच्या
दृष्टीने लहान-मोठी आहेत हे तुमच्या लक्षात येईल.
राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांचे क्षेत्रफळ महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुमारे तीन लाख चौकिमी असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून नागपूर ही उपराजधानी आहे. राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर जिल्हा हा सर्वात लहान, तर अहमदनगर जिल्हा  मोठा आहे. 
प्रशासनाच्या सोईसाठी महाराष्ट्राची 6 प्रशासकीय विभागांत विभागणी केली आहे, 
कोकण,पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर असे सहा प्रशासकीय विभाग आहेत.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा
करतो.

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

केंद्रीय कार्यकारी मंडळ