महाराष्ट्र - लोकसंख्या लोकजीवन

लोकसंख्या 

मोठ्या शहरात व त्यांच्या आसपास उद्योग धन्द्यांची  झापाटयाने  वाढ झाल्याने तेथे लोकसंख्या जास्त असते.

उदा., मुंबई, पुणे, नागपूर, नदी खोर्‍यांच्या सुपिक भागातही  लोकसंख्या जास्त आहे.
सन २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे ९ कोटी ६८ लक्ष इतकी आहे.
जनगणना २००१ नुसार मुंबई उपनगर जिल्हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे, तर सिंधुदुर्ग
जिल्हा हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.

आरोग्याच्या व वैक्यकीय सोई-सुविधा, साथीच्या रोगांचे निर्मूलन, लोकांच्या राहणीमानात
झालेली सुधारणा, तसेच देशाच्या इतर भागांतून रोजगारानिमित्त येणारे लोक यामुळे महाराष्ट्र राज्याच्या
लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

लोकजीवन

लोकांचा आहार, पोशाख, घरे, राहणीमान, भाषा, सण, उत्सव इत्यादी घटकांवर तेथील भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होतो. त्यानुसार प्रदेशातील लोकांची वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती तयार होते. यालाच लोकजीवन म्हणतात, ग्रामीण व शहरी लोकजीवनांत बराच फरक आढळतो.
शहरी भागात लोकवस्ती दाट असते. शहरात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.


पठारी प्रदेशातील लोकजीवन
पठारी भागात पर्जन्यमान कमी असल्याने येथील घरे प्रामुख्याने सपाट न छतांची असतात. ही छते धाब्याची, कौलांची किंवा पत्र्यांची असतात. घरे मातीची किंवा सिमेंटची असतात.
शेती हा पठारी भागातील प्रमुख व्यवसाय आहे. त्याबरोबरच पशुपालन हा जोडव्यवसाय केला जातो.
काही ठिकाणी कुटीरोयोग केले जातात. शहरी भागात नोकरी, व्यवसाय, कारखानदारी केली जाते. पठारावरील लोकांच्या आहारात मुख्यतः ज्वारी, बाजरीची भाकरी, तसेच विविध प्रकारच्या डाळी,
पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश असतो, मात्र राज्याच्या पूर्व भागात लोकांच्या आहारात प्रामुख्याने भात असतो. त्याबरोबरच पोळ्या, विविध प्रकारच्या डाळी यांचादेखील समावेश असतो.
पठारावरील हवामान उष्ण, कोरडे व विषम असल्यामुळे येथील लोक सुती कपडे वापरतात. येथील
पुरुष शर्ट-पँट वापरतात. स्त्रिया ब्लाउज-साडी वापरतात. याशिवाय सदरा, पायजमा, धोतर, टोपी
इत्यादींचाही वापर केला जातो. तरुण मुले-मुली आधुनिक पोशाख करतात. या भागात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. नाशिक विभागाच्या उत्तर भागात अहिराणी भाषा
बोलली जाते. होळी, दसरा-दिवाळी, बैलपोळा इत्यादी सण साजरे केले जातात. विविध धर्मीय लोक आपापले
सण साजरे करतात.

आदिवासी लोकजीवन
फार पूर्वीपासून काही लोक दुर्गम भागात राहत आहेत. त्या भागातील
उपलब्ध नैसर्गिक साधनांवर ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या परंपरागत बोली भाषा, पोशाख,
चालीरीती आहेत. या लोकांना आदिवासी म्हणतात.




महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती व त्यांचे वास्तव्य क्षेत्र

गोंड
वास्तव्य असणारा प्रदेश
चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड.

भिल्ल
धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वताचा प्रदेश, तसेच अहमदनगर,
नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ भाग.

कोकणा
नाशिक, धुळे जिल्ह्यांचा डोंगराळ भाग.

कोरकू
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेश.

वारली
ठाणे जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, मोखाडा, तलासरीचा जंगलपट्टीचा प्रदेश.

ठाकर, महादेव कोळी
पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील डोंगराळ व पठारी प्रदेश.

कोलाम
राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेश,

आंध
परभणी, नांदेड, अकोला, यवतमाळ.

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

केंद्रीय कार्यकारी मंडळ