महाराष्ट्र : जलसंपत्ती व सागरसंपत्ती

महाराष्ट्र : जलसंपत्ती व सागरसंपत्ती

सजीवांसाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला नदी, विहीर, तलाव इत्यादींपासून पाणी मिळते.  या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, शेती, कारखानदारी, वीजनिर्मिती व घरगुती कामासाठी करतो.
सागराचे पाणी खारे असते. सागरापासून आपल्याला विविध उपयुक्त संपत्ती मिळते.



जलसंपत्ती

महाराष्ट्रातील प्रमुख जलस्रोत : नद्या, धरणे, तलाव, विहिरी इत्यादी प्रमुख जलस्रोत आहेत.

विहिरी आणि कूपनलिका : विहीर हे महाराष्ट्रातील पाणीपुरवठ्याचे प्रमुख साधन आहे. पावसाचे पाणी खडकातील भेगा, फटी व छिद्रांमध्ये झिरपून जमिनीमध्ये साठते. याला भूजल म्हणतात. हे पाणी विहिरी व कूपनलिका यांद्वारे उपलब्ध केले जाते. 
महाराष्ट्रात बेसाल्ट या अग्निज खडकाचे प्रमाण जास्त आहे. हा खडक कठीण व अछिद्र असल्याने
यामध्ये भूजलाची उपलब्धता मर्यादित असते. नदीकिनारी, गाळाच्या किंवा सच्छिद्र खडकांच्या
प्रदेशात विहिरींचा व कूपनलिकांचा वापर पाणी मिळवण्यासाठी केला जातो. शेतीसाठी या पाण्याचा
प्रामुख्याने वापर होतो. 

राज्यातील भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने कूपनलिका व विहिरींना पाणी अपुरे पडत
आहे. काही भागांत विहिरी व कूपनलिका कोरड्या पड़ लागल्या आहेत,
आपल्या राज्यातील ही परिस्थिती बदलण्यासाठी भूजलाचा वापर योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. तसेच
भूजल सतत उपलब्ध व्हावे याकरिता पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे आवश्यक
विविध प्रकारचे बंधारे व समतल चर जागोजागी आहे करणे व वृक्षलागवड करणे आवश्यक कामांना जलसंधारणाची कामे म्हणतात.


नद्या, धरणे व तलाव : महाराष्ट्रातील अनेक नक्ष्यांवर धरणे बांधली आहेत. धरणातून कालवे के शेतीला पाणीपुरवठा केला जातो. तलाव आ धरणांच्या जलाशयांत मासेमारी केली जाते. काही धरणांवर वीजनिर्मिती केली जाते. पोफळी (कोयना), जायकवाडी, भिरा, येलदरी, राधानगरी, खोपोली,
भिवपुरी इत्यादी ठिकाणी राज्यातील प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्रे आहेत



सागरसंपत्ती
सागरापासूनही आपल्याला संपत्ती मिळते. यात विविध खनिजे, शंख-शिंपले, वाळ, मीठ व मासे याचा समावेश होतो. सागरकिनारी आणि खाड्यांमधून वाळू मिळते.
आणी या वाळूमधून खनिजे मिळतात. तसेच वाळूचा उपयोग बांधकाम उड्योगात होता.
सागरकिना-यावर मिळणाच्या शंख-शिंपल्यापासून हस्तकलेच्या विविध वस्तू बनवतात. सागराच्या पाण्यात क्षार असतात. त्यापासून आपल्याला मीठ मिळते. भरतीच्या वेळी सागराचे पाणी जमिनीवर आतपर्यंत येते. 

अशा भागात वाफे तयार करतात. त्यांत हे भरतीचे पाणी साठवले जाते. या
पाण्याचे बाष्पीभवन होते व वाफ्यांमध्ये मीठ शिल्लक राहते. ज्या ठिकाणी अशा प्रकारे मीठ तयार होते त्याला
मिठागर म्हणतात. राज्यात वसई, भाईंदर, डहाणू इत्यादी ठिकाणी मिठागरे आहेत.
महाराष्ट्र राज्याला ७२० किमी लांबीचा सागर किनारा लाभला आहे. या किना-यालगत मासेमारी
केली जाते. मासे ही समुद्रातून मिळणारी एक महत्त्वाची संपत्ती आहे. सागरी मासेमारीत आपले
राज्य आग्रेसर आहे. विविध प्रकारचे मासे व इतर जलचर सागराच्या पाण्यात असतात. पापलेट, सुरमई,
रावस, बोंबील, कोळंबी, कालव, शिंपले इत्यादी

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

केंद्रीय कार्यकारी मंडळ