भारतातील लोकसंख्या व लोकजीवन

लोकसंख्या
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात लोकसंख्येत सातत्याने वाढ झालेली दिसून येते. वैद्यकीय
उपचारांच्या सुविधा, साथीच्या रोगांचे निर्मुलन, राहणीमानातील सुधारणा यांमुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले
आहे. परंतु जन्माचे प्रमाण मात्र फारसे कमी झालेले नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढलेली दिसते.

सन २००१ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १०२ कोटी ७० लक्ष आहे.

लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. देशाच्या काही भागांत लोकसंख्या जास्त आहे, तर
काही भागांत कमी आहे. नक्ष्यांची सुपीक खोरी, चांगल्या हवामानाचे प्रदेश, सर्व सोई सहज उपलब्ध असलेल्याठिकाणी लोकवस्ती जास्त आहे. उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने अनेक लोक खेड्यांतून शहरांत येऊन राहतात. शहरांत राहणा-या लोकांची संख्याही जास्त असते.

देशातील वाळवंटी प्रदेश, उंच पर्वतरांगांमधील दुर्गम प्रदेश अशा ठिकाणी लोकसंख्या कमी आढळते. दर चौरस  किमी क्षेत्रात सरासरी किती लोक राहतात याचे प्रमाण. काढता येते. या प्रमाणास लोकसंख्येची घनता असे म्हणतात. पश्चिम बंगाल हे सर्वांत जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे.
सर्वांत कमी लोकसंख्येची घनता अरुणाचल प्रदेशातआढळते.

भारतात ७२% लोक ग्रामीण भागात राहतात, तथापि नागरी लोकसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबई हे।
भारतातील सर्वांत जास्त नागरी लोकसंख्येचे शहर आहे. भारतात स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे.
देशाच्या जलद विकासासाठी देशातील नागरिक निरोगी, कार्यक्षम आणि शिक्षित असायला हवेत. देशात
साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे. केरळ राज्यात सर्वात जास्त साक्षरता आहे.

* लोकसंख्या वाढ व वाढीचे परिणाम
आपल्यादेशात दर दहा वर्षांनी जनगणका केली जाते. त्यामधून बरीचशी माहिती मिळते. या माहितीचा उपयोग
नियोजनासाठी केला जातो. गेल्या काही दशकांत आपल्या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय
क्षेत्रात होणा-या प्रगतीमुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामानाने जन्माचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे
लोकसंख्या वाढते. लोकसंख्येत होणा-या वाढीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. लोकसंख्या वाढली तरी
साधनसंपत्तीमध्ये वाढ होत नाही. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर खूप ताण पडतो. त्याशिवाय नागरिकांना
पुरवायच्या सेवांवर ताण पडतो. अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागतो. यातूनच कुपोषण, रोगराई अशा समस्या निर्माण होतात. यासाठी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण
करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. देशातील लोक हीसुद्धा देशाची संपत्ती असते. तिचा योग्य वापर करून देशाचा विकास करता येतो. या संपत्तीचा जास्त लोकसंख्या किंवा कमी लोकसंख्या
यांच्याशी संबंध नसतो, तर नागरिकांचे शिक्षण, कौशल्य व क्षमता यांवर ती अवलंबून असते. जन्मप्रमाणावर नियंत्रण ठेवल्यास लोकसंख्यावाढीवर नियंत्रण राहील. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणा-या समस्यांना आळा बसेल. देशाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.


लोकजीवन
भारतात प्राकृतिक रचना, हवामान यांमध्ये बरीच विविधता आहे. त्यामुळे लोकजीवनातही विविधता आढळते. पोशाख, अन्न, घरे, व्यवसाय यांबाबतीत वेगवेगळ्या प्रदेशांत विविधता दिसून येते.

१. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश : जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड हे थंड हवामानाचे प्रदेश आहेत. या प्रदेशांत घरबांधणीसाठी लाकडाचा उपयोग जास्त करतात. हिम घसरून जाण्यासाठी घराचे
छप्पर तीव्र उताराचे असते. लोक सर्व अंग झाकले जाईल असे जाड व उबदार कपडे वापरतात. भात, दाल, रोटी,
भाजी हे मुख्य अन्न आहे. लोक वर्णाने गोरे, देखणे, कष्टाळू आणि धडधाकट आहेत. शेती, फळबागायत,
मेषपालन, विणकाम हे प्रमुख व्यवसाय आहेत. हे लोक कलाकुसरीच्या कामात प्रवीण आहेत. येथील शाली व
गालिचे भारताबाहेरही प्रसिद्ध आहेत. हा प्रदेश सृष्टिसौंदर्याने नटलेला असल्याने पर्यटन व्यवसायाला येथे
महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वेकडील नागालँड, आसाम, मिझोरम, मणिपूर
इत्यादी राज्यांत खूप पाऊस पडतो. या भागांत घरे उतरत्या छपराची असतात. घरे जमिनीपासून उंचावर बांधली जातात. स्त्रिया सुती शालींचा वापर करतात. अंगात पोलकी, जाकीट घालून ओढणीप्रमाणे शाल पांघरतात.भात हे मुख्य अन्न आहे. त्याबरोबर बांबूचे कोंब व
अननसाची भाजी खातात.
चहा हे आवडते पेय आहे. चहाच्या मळ्यात, खाणीत काम करणे, शाली विणणे हे येथील लोकांचे व्यवसाय असले, तरी शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.

२. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश : हिमालयातील नक्यांच्या गाळामुळे हा प्रदेश अत्यंत सुपीक बनला आहे.
पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते. पश्चिमेकडे राजस्थानचा अपवाद सोडल्यास हा प्रदेश
मानवी जीवनास अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे भारतातील जास्त लोकसंख्या असलेला हा प्रदेश आहे. नारळाच्या झावळ्या व बांबू वापरतात. स्त्रिया चणिया, चोळी व नक्षीदार ओढणी, साडी वापरतात. पुरुष अंगात
बंडी, धोतर, पायात चढाव, डोक्याला पागोटे असा वेश करतात,
ज्वारी, बाजरी, गहू, मका, भात, कडधान्ये, डाळी असा साधा आहार असतो. दूध व दुग्धजन्य पदार्थही
असतात. स्वयंपाकासाठी तिळाचे अथवा मोहरीचे तेल वापरतात, शेती व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय आहेत
.
३. पठारी प्रदेश : इतर प्राकृतिक विभागांच्या तुलनेत पठारी प्रदेशाचा विस्तार जास्त असल्याने नैसर्गिक परिस्थितीतील फरक जास्त आहे. त्यामुळे लोकजीवनातही विविधता दिसून येते. जास्त पर्जन्याच्या प्रदेशात उतरत्या छपराची कौलारू परे असतात.काही ठिकाणी छपरांसाठी बांबू व गवताचा वापर करतात. कमी पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात मातीची, जाड भिंतीची व सपाट छपरांची घरे असतात.
साडी, चोळी किंवा घागरा व ओढणी असा पोशाख स्त्रिया करतात. धोतर, सदरा, पागोटे किंवा टोपी असा पुरुषांचा पोशाख असतो. उन्हाळ्यात सुती कपडे व हिवाळ्यात
उबदार कपडे वापरतात. यांच्या आहारात ज्वारी, बाजरी, गहू, कडधान्ये, फळे, कंदमुळे, दूध व दुधाचे पदार्थ इत्यादी असतात. शेती हा प्रमुख व्यवसाय आहे व पशुपालन हा जोड व्यवसाय आहे.

४. किनारी मैदानी प्रदेश : पश्चिम किनारी प्रदेशात
जास्त पाऊस पडतो. पूर्व किनारी प्रदेशात पावसाचे प्रमाणमध्यम स्वरूपाचे आहे. जास्त पावसाच्या प्रदेशात घरे
दगड, मातीची व उतरत्या छपराची असतात. तसेचकुडाच्या भिंतींची व छपरांवर नारळाच्या झावळ्यांनीशाकारणी केलेली घरेही बाधतात.

|हवामान उष्ण व दमट असल्याने सुती कपडेवापरतात. स्त्रिया साडी, चोळी तर पुरुष धोतर, सदरा,
लुंगी वापरतात. आहारात भात, नारळ, मासे यांचासमावेश असतो. अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी खोबरेल
तेलाचा वापर करतात. फळबागायत, शेती, पशुपालन वमासेमारी हे प्रमुख व्यवसाय आहेत.

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

केंद्रीय कार्यकारी मंडळ