भारत - खनिज संपत्ति व उर्जा साधने

खनिजे
खनिजांचे धातू व अधातू खनिजे असे प्रकार आहेत.

धातू खनिजे : ज्या खनिजांपासून धातू तयार करता येतात त्यांना धातू खनिजे असे म्हणतात.

(१) लोहखनिज : भारतात उत्तम दर्जाच्या
लोहखनिजाचे साठे आहेत. लोहखनिजापासून लोह व पोलादाची निर्मिती केली जाते. लोह व पोलादापासून विविध प्रकारची यंत्रे, शेतीची अवजारे, वाहने, घरगुती उपकरणे इत्यादी तयार करतात. पोलाद तयार करण्यासाठी लोहखनिज, चुनखडक व दगडी कोळसा आवश्यक असतो.
ओडिशा, झारखंड, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यांत
लोहखनिजाचे साठे आढळतात.

(२) तांबे : हा धातू भांडी, नाणी, पत्रा, दागिने तयार करण्यासाठी वापरतात. तांबे उत्तम वीजवाहक आहे.
त्यामुळे विजेच्या उपकरणांत याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. झारखंड, राजस्थान, गुजरात आंध्र प्रदेश, उत्तराखंड इत्यादी राज्यांत तांब्याचे साठे आहेत.

(३) मँगनीज : पोलाद तयार करण्यासाठी या खनिजाचा तू खनिजे प्रामुख्याने उपयोग होतो. देशात मॅगनीजचे भरपूर साठे असून त्याचा दर्जाही उत्तम आहे. कर्नाटक, ओडिशा, मध्य प्रदेश,
महाराष्ट्र व गोवा या राज्यांत मँगनीज आढळते.

(४) बॉक्साईट : बॉक्साईट या खनिजापासून अॅल्यमिनिअम
धातू तयार केला जातो. हा धातू हलका व लवचीक आहे. तो गंजत नसल्याने त्याचा उपयोग भांडी, वेगवेगळी वाहने, विमाने, जहाज निर्मिती, विद्युत उपकरणे व लाकडाला पर्याय म्हणून फर्निचर
उड्योगात केला जातो. भारतात बॉक्साईटचे साठे ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, महाराष्ट्र, झारखंड, तमिळनाडू व मध्य प्रदेश या राज्यांत आहेत.

(५) सोने : सोने हा मौल्यवान धातू आहे. आकर्षक रंग, झळाळी,लवचीकता हे सोन्याचे गुणधर्म आहेत. भारतात सोन्याचा सर्वाधिक उपयोग दागिने तयार करण्यासाठी होतो. भारतातील सोन्याचे साठे मर्यादित आहेत. देशात कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांत सोन्याचे साठे आहेत.

अधातू खनिजे : ज्या खनिजांपासून धातू तयार करता येत नाहीत त्यांना अधातू खनिजे म्हणतात. अभ्रक,
जिप्सम, चुनखडक इत्यादी अधातू खनिजे आहेत.

(१) अभ्रक : भारत हा जगातील प्रमुख अभ्रक उत्पादक देश आहे. भारतातील अभ्रकाचा दर्जा चांगला
आहे. अभ्रकाचा उपयोग विढ्युत उपकरणे, औषधे व रंग उद्योगांत करतात. भारतात आंध्र प्रदेश, झारखंड, बिहार व राजस्थान राज्यांत अभ्रकाचे साठे आढळतात.

(२) जिप्सम : जिप्समचा उपयोग सिमेंट व रासायनिक खते तयार करण्यासाठी होतो. राजस्थानमध्ये
जिप्समचे साठे जास्त आहेत. त्याशिवाय जम्मू आणि काश्मीर, तमिळनाडू इत्यादी राज्यांत जिप्सम सापडते.

(३) चुनखडक : बांधकाम उड्योगामध्ये, सिमेंट तयार करण्यासाठी व लोहखनिज शुद्ध करण्यासाठी चुनखडक
वापरतात. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, ओडिशा, कर्नाटक राज्यांत चुनखडीचे साठे आढळतात.
याशिवाय अॅस्बेस्टॉस, सैंधव, हिरे, युरेनियम, थोरियम ही उपयुक्त खनिजे
भारतात आढळतात. खनिजांचे साठे मर्यादित असतात. ती सर्वत्र सहजरीत्या उपलब्ध होत नाहीत. खनिजे वापरल्यानंतर संपतात. त्यामुळे खनिजांचा आवश्यक तेवढाच वापर केला पाहिजे.

ऊर्जा साधने
ज्या साधनांपासून ऊर्जा मिळवली जाते, त्यांना ऊर्जा साधने म्हणतात.ऊर्जा साधनांचे पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा साधने असे वर्गीकरण करतात.

पारंपरिक ऊर्जा साधने : मानव ऊर्जा निर्मितीसाठी ज्या ऊर्जा साधनांचा वापर पूर्वीपासून करतो आहे, त्यांस पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात. लाकूड, कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू ही पारंपरिक ऊर्जा
साधने आहेत.

कोळसा : प्राचीन काळी भूहालचालींमुळे वनस्पती गाडल्या गेल्या. त्यावर दाब व उष्णतेचा परिणाम होऊन त्यातील कार्बन द्रव्ये शिल्लक राहिली. त्यापासून कोळसा
तयार झाला. पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ़, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत कोळशाच्या खाणी आहेत. याशिवाय जम्मू आणि काश्मीर, मेघालय व तमिळनाडू या राज्यांत मध्यम व कमी प्रतीचा कोळसा सापडतो.

खनिज तेल व नैसर्गिक वायू : भूहालचालींमुळे दबल्या गेलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांचे विघटनहोऊन खनिज तेल व नैसर्गिक वायूची निर्मिती होते. खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे जवळजवळ आढळतात. काहीठिकाणी फक्त नैसर्गिक वायूचे साठे असतात. खनिज तेलशुद्ध करून वापरावे लागते. भारतात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन आसाम, गुजरात, महाराष्ट्र (मुंबई हाय) या राज्यांत होते. याशिवाय राजस्थान, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रात नवीन साठे सापडले आहेत.

अपारंपरिक ऊर्जा साधने : सूर्याची उष्णता, वारा, भरती-ओहोटी, बायोगॅस, जैविक टाकाऊ पदार्थ या
साधनांपासून ऊर्जा मिळवण्याचे प्रयत्न अलीकडे केले जात आहेत. या साधनांना अपारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात. यापासून मिळणाच्या ऊर्जेस अपारंपरिक ऊर्जा असे म्हणतात.
सूर्यकिरणांपासून सौरऊर्जा मिळवता येते. 
जैविक टाकाऊ पदार्थापासून ज्वलनशील वायू मिळतो. वा-याचा उपयोग करून विद्युत निर्मिती करता येते. सागरी लाटा वभरती-ओहोटीचा उपयोगदेखील ऊर्जा निर्मितीसाठी होऊ शकतो. भूगर्भातील उष्णतेचा ऊर्जा साधन म्हणून उपयोगहोतो. सध्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा उपयोग सुरू झाला आहे. दिल्लीजवळील तिमारपूर येथे टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे. हिमाचल प्रदेशातील मणिकरण येथे भूगर्भातील उष्णतेचा वापर करून ऊर्जा निर्माण केली जाते. शहरांतून टाकाऊ पदार्थ मोठ्या
प्रमाणावर तयार होतात. 
या टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा निर्मिती करण्याचे प्रकल्प अनेक शहरांतून सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
विद्युत निर्मिती मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज असते तेव्हा वेगवेगळ्या ऊर्जा साधनांचा उपयोग करून विद्युत निर्मिती करणे सोईचे असते. वीज निर्मितीसाठी पाणी, वारा, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू व अणुऊर्जा यांचा वापर केला जातो. निर्मिती साधनांवरून विजेचे जलविद्युत, औष्णिक
विढ्युत, अणुविढ्युत, पवन विद्युत असे प्रकार करता येतात.

(१) जलविद्युत : जलविढ्युत निर्मितीसाठी वर्षभर पाण्याचा भरपूर पुरवठा असावा लागतो. त्यासाठी नट्यांचे पाणी अडवून जलाशय तयार करतात. विड्युत
निर्मितीसाठी पाणी वापरल्यानंतर त्याचा पुन्हा वापर करता येतो. जलविद्युत वापरामुळे पर्यावरणाची हानी कमी होते.

(२) औष्णिक विद्युत : कोळसा, खनिज तेल व
नैसर्गिक वायूचा उपयोग करून औष्णिक विद्युत निर्माण करतात. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रे प्रामुख्याने कोळसा किंवा खनिज तेलक्षेत्राजवळ आढळतात. भारतात
कोळशाचा वापर करून सर्वाधिक विद्युत निर्मिती केली
जाते.

(३) अणुविद्युत : अणूचे विभाजन करून मोठ्या
प्रमाणात ऊर्जा मिळवता येते. यासाठी युरेनियम व थोरियम
या खनिजांचा वापर करतात. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान,तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांत अणुवीज निर्मिती केंद्रे आहेत. अणूपासून वीज निर्माण करणा-या
मोजक्या देशांपैकी भारत हा एक देश आहे.

ऊर्जा साधनांचे संधारण : खनिज तेल, नैसर्गिक
|वायू व कोळसा या पारंपरिक ऊर्जा साधनांचे साठे मर्यादित आहेत. त्यामुळे या ऊर्जा साधनांचा वापर अतिशय
काळजीपूर्वक केला पाहिजे. वाढते शहरीकरण,
उठ्योगीकरण यांमुळे ऊर्जेची मागणी सतत वाढत आहे.त्यासाठी पर्यायी व अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करणे

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

केंद्रीय कार्यकारी मंडळ