समास

समास



समास - दोन किंवा दोनांपेक्षा अधिक शब्दामधील विभक्ती प्रत्यय अथवा संबंध दर्शक शब्द गाळून त्यापासून जो एक संयुक्‍त शब्द बनविला जातो त्या पद्धतीस “समास” म्हणतात, अशा रीतीने तयार झालेल्या संयुक्‍त (जोडशब्द) शब्दाला सामासिक शब्द म्हणतात.

उदा.,- राजाचा वाडा - राजवाडा हा सामासिक शब्द.
ज्या निरनिराळ्या शब्दांचा समास बनतो त्या शब्दांना समासातील पदे असे म्हणतात.

उदा.,- राजवाडा या समासातील राजा व वाडा ही दोन पदे आहेत.
समास कसा तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्यात जोडल्या जाणाऱ्या शब्दांना आवश्यक ते प्रत्यय लावून किंवा काही ठिकाणी अन्य शब्दांचे सहाय्य घेऊन त्यांची फोड करावी लागते. ह्या फोड करण्याच्या पद्धतीला त्या समासाचा विग्रह असे म्हणतात.

उदा., १) तोंडपाठ तोंडाने पाठ (विग्रह) २) सत्यासत्य - सत्य किंवा असत्य
समासाचे एकूण चार प्रकार आहेत
१) अव्ययीभाव समास
२) तत्पुरुष समास
3) द्वंद्व समास
४) बहुव्रीही  समास

१) अव्ययीभाव समास -

 किंवा (प्रथमपद प्रधान समास) - ज्या समासात विशेषत: पहिले पद मुरव्य असते किंवा पहिला शब्द अव्यय असतो आणि सर्व मिळून तो समासिक शब्द क्रियाविशेषण अव्यय होतो, त्या समासास अव्ययीभाव समास असेम्हणतात.

उदा.
आजन्म - जन्मापासून प्रतिवर्ष - प्रत्येक वर्षी
आमरण - सरणापर्यंत यथाशक्ती - शक्‍ती प्रमाणे
प्रतिदिन - प्रत्येक दिवशी दारोदार - प्रत्येकदारी
काठोकाठ - काठापर्यंत देशोदेशी - प्रत्येक देशात
घडोघडी - प्रत्येक घडीला गावोगाव - दर गावी
प्रतिक्षण - प्रत्येक क्षणी यथाविधी - विधीप्रमाणे
यथान्याय - न्यायाप्रमाणे यथाशास्त्र - शास्त्राप्रमाणे
यथाक्रम - क्रमाप्रमाणे यथायोग्य - योग्य असे
यथायुक्‍्त - युक्‍त असे दिवसेंदिवस  - प्रत्येक दिवशी
दरसाल - प्रत्येक साली क्षणोक्षणी - प्रत्येक क्षणाला
हरघडी - प्रत्येक घडीला जागोजाग - प्रत्येक जागी
रस्तोरस्ती - प्रत्येक रस्ती गल्लोगल्ली  - प्रत्येक गल्लीत
आळोआळी  - प्रत्येक आळीत आकंठ - कंठापर्यंत
विनाकारण  - करणाशिवाय अनुरूप - रूपास योग्य
बेकायदा - कायद्या विरुद्ध गेरहजर - हजर नसलेला
बिनतक्रार - तक्रार न करता नापसंत - पसंत नसलेला
यावज्जीव - जीव असेपर्यंत गेरवाजवी - वाजवी नसलेला
गेरशिस्त - शिस्त नसलेला बारामास - बारामहिने पर्यंत
बेसुमार - सुमार नसलेले बिनतोड - तोड नसलेला
आसेतुहिमाचल - सेतूपासून हिमाचला पर्यंत


२) तत्पुरूष समास - 

द्वितीय पद प्रधान समास - ज्या समासात दुसरे पद मुरव्य असते आणि अर्थदृष्टया
गाळलेला विभक्ती प्रत्यय किंवा शब्द विग्रहामध्ये घालावे लागतात, त्या समासास तत्पुरुष समास असे म्हणतात.

तत्पुरुष समासाचे प्रकार -
आ) विभक्ती तत्पुरुष समास,
आ) उपपद तत्पुरुष समास,
इ) कर्मधारय समास,
ईई). दुविगृू समास,
उ) मध्यमपद लोपी समास
आ) विभक्ती तत्पुरुष समास 

१) द्वितीया तत्पुरुष समास -
मन: + ताप = मनाला ताप = मनस्ताप
दु:रवप्राप्त = दुःरवाला प्राप्त
 देशगत = देशास गत

२) तृतीया तत्पुरुष समास -
परस्परनिगडित = परस्पराशी निगडित
ईश्‍वरनिर्मित =  ईश्‍वराने निर्मित हस्तलिसित २ हाताने लिहिलेले
मतिमंद = मतीने मंद 
मातृसदृश =  मातेशी सदश
तत्सम = त्याशी सम 
तोंडपाठ  =. तोंडाने पाठ
दुप्पट = दोहोंनी फ्ट 

स्वाध्याय  = पुढील समासिक शब्दांचे विग्रह करा -
दयार्द्र भक्तिवश, द्रव्यसाध्य, कष्टसाध्य, ईश्वरदत्त, मन:कल्पित, कृपावलोकन, गुणहीन, गजमोजणी, घोडेमात, प्यादेमात,
बुद्धिजड, कपाळ-करंटा, तोंडजबानी.


-------------------------------------
३) चवुर्थी तत्पुरुष समास -
ग्रंथालय - ग्रंथासाठी आलय 
विद्यागृह - विद्येसाठी ग्रह
पोळपाट - पोळीसाठी पाट 
ब्राह्मणभोजन - ब्राह्मणासाठी भोजन
क्रीडांगण - क्रीडेसाठी अंगण 
क्रीडाभुवन - क्रिडेसाठी भुवन
गायरान - गायीसाठी असलेले रान 
व्यवहारोपयोगी - व्यवहारासाठी उपयोगी
पूजाद्रव्य - पुजेसाठी द्रव्य 
कंबरफ्टटा - कंबरेसाठी फ्टटा
वाटरवर्च - वाटेसाठी लागणारा रवर्च

स्वाध्याय - पुढील सामासिक शब्दांचे विग्रह करा -
मेंढवाडा, व्याहीजेवण, बाईलवेडा, कमरबंद, गावसमाराधना

४) पंचमी तत्पुरुष समास -
चोरभय - चोरापासून भय 
संकटमुक्‍्त - संकटापासून मुक्‍त
त्रणमुक्‍त - क्रणापासून मुक्‍त 
धर्मभ्रष्ट - धर्मातून भ्रष्ट
रोगमुक्त - रोगापासून मुक्‍त 
मनुज - मनुपासून जन्मलेला
स्वर्गश्रष्ट - स्वर्गातून भ्रष्ट 
जातीशभ्रष्ट - जातीतून भ्रष्ट
मामेभाऊ - मामाकडून भाऊ

५) वष्टी तत्पुरुष समास -
लोकमित्र - लोकांचा मित्र देवपूजा - देवाची पूजा
सूर्यप्रकाश - सूर्याचा प्रकाश राजमंदिर - राजाचे मंदिर
लक्ष्मीकांत  - लक्ष्मीचा कांत केळफूल - केळीचे फूल
धर्मवेड - धर्माचे वेड जनसेवा - जनांची सेवा
राद्वाध्वज - राष्ट्राचा ध्वज हिमाद्री - हिमाचा अद्री
समुद्रकाठ - समुद्राचा काठ विद्याभ्यास - विद्येचा अभ्यास
देवभक्ती - देवाची भक्‍ती घोडदौड - घोड्याची दोड
पिंपळपान - पिंपळाचे पान पुष्पमाला - पुष्पांची माला
दलितोद्धारण - दलितांचे उद्धारण बालमित्र - बालपणचा मित्र
ईश्वरभक्ती  - ईश्वराची भक्‍ती देशाभिमान  - देशाचा अभिमान

६) सप्तमी तत्पुरुष समास -
नृपवर - नृपात वर श्रेष्ठ)
शास्त्रपंडित  - शास्त्रात पंडित
कलाकुशन  - कलेत कुशल
घरकोंबडा  - घरात राहणारा
स्वर्गवास - स्वर्गात असे वास

आ) उपपद तत्पुरुष समास -
 जेव्हा तत्पुरुष समासातील दुसरे पद-ज्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होत नाही, अशा
प्रकारचे - कृदंत - म्हणजे धातुसाधित असते. तेव्हा त्यास उपपद तत्पुरुष समास म्हणतात.

कुंभकार - कुंभ करणारा 
ग्रंथकार - ग्रंथ करणारा
द्विजि - दोनदा जन्मणारा 
दुतोंड्या - दोन तोंडे असणारा
पदवीधर - पदवी धारण करणारा 
जन्मदा - जन्म देणारी
स््क्ज्ञ - सर्व जाणणारा 
जलद - जल देणारा
ग्ह्स्थ - गृहात राहणारा 
शेषशायी - शेषावर निजणारा
शास्त्रज्ञ - शास्त्र जाणणारा 
शेतकरी - शेती करणारा
कामकरी - काम करणारा
ह्या समासात कार, स्थ, शायी, ज ही दुसरी पदे क, स्था, शे, जन, ह्या धातूपासून झालेली असून त्याचा असल्या सामासिक शब्दशिवाय दुसर्‍या कोठे ही स्वतंत्रपणे उपयोग होत नसल्याने हे उपपद तत्पुरुष समास आहेत.

इ) कर्मधारय समास -
 दोन्ही पदे प्रथमा विभक्‍्तीत, दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही पदे विशेषण, उपमान किंवा रूपक म्हणून
वापरतात. याचे दोन पोट प्रकार आहेत.
१) दृविगृ समास २) मध्यमपद लोपी समास
उदा. पीतांबर पीत (पिवळे) असे अंबर (वस्त्र)
पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष 
विद्याधन - विद्या हेच धन
सुवासना - सु (वांगली) अशी वासना 
चरणकमल - चरणरूपी कमल
कमलनयन  - कमलासाररवे नयन 
मुरव्याध्यापकी - मुरव्य असा अध्यापक
महादेव - महा असा देव 
अन्नब्रह्म - अन्नरुपी ब्रह्म
गलितगात्र  - गलित असे गात्र 
कृष्णकमल - कृष्ण असे कमल
गोधन - गो हेच धन 
कुरूप - कु असे रूप
मुरवचंद्र - मुरव हाच चंद्र 
महात्मा - महान असा आत्मा
बालाकिरण  - बाल असे किरण

१) दुविग्रू समास - ज्या कर्मधारय समासात पहिले पद संरव्यावाचक विशेषण असून त्या शब्दाच्या योगाने
समुदायाचा अर्थ उत्पन्न होतो. सर्व शब्द एकक्चनीच असतात. त्यास द्विगू समास म्हणतात.
उदा.
नवरात्र - नऊ रात्रीचा सगरृह पंचारती - पाच आरत्यांचा समूह
पंचपाळे - पाच पाळ्यांचा समुदाय त्रिभुवन - तीन भुवनांचा समूह
चातुर्मास - वार महिन्यांचा समूह नक्ग्रह - नऊ ग्रहांचा समुदाय
सप्ताह- सात आहांचा (दिवसांचा) समूह त्रेलोक्‍्य - तीन लोकांचा समूह

२) मध्यमपद लोपी समास - ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसर्‍या पदाशी संबंध दारवविणारा एक शब्द असे अनेकशब्द लुप्त असतात व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते. त्यास मध्यमपद लोपी समास असे म्हणतात.

उदा.
सारवरभात  - सारवरेने युक्‍त भात
पुरणपोळी - पुरण भरून केलेली पोळी
वांगीपोहे - वांगी घालून केलेले पोहे
बटाटेभात - बटाटे घालून केलेला भात
भाचेजावई  - भाचीचा नवरा म्हणून जावई
मामेभाऊ - मामाचा मुलगा म्हणून मामेभाऊ

स्वाध्याय -
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा - कांदेपोहे, बांगीभात, घोडेस्वार, बालमित्र, भोजनभाऊ, मीठभाकर, जन्मदरिद्री,हस्ताक्षर, दहीभात.

ईई). नत्र तत्पुरुष समास - अभाव किंवा निषेध या अर्थी व्यंजनादि शब्दांचे पुर्वी आणि स्वरादी शब्दांचे पूर्वीही अव्यये येऊन जे तत्पुरुष समास होतात, त्यास नत्र तत्पुरुष समास म्हणतात,

अन्याय  - न न्याय 
अब्रह्मण - न ब्राह्मण
अनादर - न आदर 
अयोग्य - न योग्य
अनिष्ट - नईइट

स्वाध्याय - पुढील सामासिक शब्दांचे विग्रह करा -
अजाण, अपुरा, अनोळरवी, नपुंसक, नापसंत

3) द्वंद्व समास -

क्रियापद प्रधान - उभयपदे महत्त्वाची - ज्या समासतील दोन्ही पदे प्रधान असतात त्यास द्वंदद असे
म्हणतात. यात समासाचा विग्रह करताना दोन पदांचा संबंध “आणि, व. अथवा, किंवा अशा उभयान्वयी अव्ययानी स्पष्ट
करावा लागतो.
उदा.,
मातापिता - माता आणि पिता
पापपुण्य - पाप अथवा पुण्य
कृष्णार्जुन - कृष्ण व अर्जुन
न्यायान्याय  - न्याय किंवा अन्याय


द्वंद्व समासाचे तीन प्रकार आहेत
अ) इतरेतर द्वंद्व ब) वैकल्पिक द्वंद क) समाहार द्वंद्व

अ) इतरेतर द्वंद्व - ह्या समासातील पदांमध्ये आणि, व.” समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यये विग्रहाच्या वेळी घालावी लागतात.

आईवडील  - आई आणि वडील
नवराबायको - नवरा व बायको
तहानभूक - तहान आणि भूक
यक्षकिन्नर - यक्ष आणि किन्नर
राधाकृष्ण - राधा आणि कृष्ण
सेवा्थुश्रुषा - सेवा आणि शुश्रुषा
स्रीपुरुष - स्त्री आणि पुरुष
कोरवपांडव - कोरव आणि पांडव
दहीभात - दही आणि भात
उघडबोडका  - उघडा आणि बोडका
स्पृश्यास्पृश्य - स्पृश्य आणि अस्पृश्य
रवाचरवळगे  - सवाच आणि सवळगे
पळीपंचपात्रे - पळी आणि फपंचपात्रे
रामलक्ष्मण - राम आणि लक्ष्मण
लेकीयुना - लेकी आणि सुना
वृक्षलता - वृक्ष आणि लता
हातपाय - हात आणि पाय
कृष्णार्जुन - कृष्ण आणि अर्जुन
प्रश्नोत्तर - प्रश्‍न आणि उत्तर

 ब) वैकल्पिक द्वंद्व - ह्या समासातील पदामध्ये विग्रहाच्या वेळी (अथवा, किंवा” ह्यापैकी विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये घालावी लागतात. अर्थाच्या दृष्टीने समासातील दोन्ही प्रधान पदापेकी एकाचीच मात्र अपेक्षा असते.

उदा - आशानिराशा - आशा किंवा निराशा
बरेवाईट - बरे किंवा वाईट
रवरेरवोटे - रवरे किंवा रवोटे
देवदानव - देव किंवा दानव
जयपराजय  - जय किंवा पराजय
न्यायान्याय - न्याय किंवा अन्याय
पासनापास - पास किंवा नापास
नेआण - नेणे किंवा आणणे
सारासार - सार किंवा असार
पापपुण्य - पाप किंवा पुण्य
मानापमान - मान किंवा अपमान
चारपाच - चार किंवा पाच
इकडेतिकडे  - इकडे किंवा तिकडे

क) समाहार द्वंद्व - ह्यात समासयुक्‍त पदांच्या अथाशिवाय आणरवी तशाच प्रकारच्या अधिक गोष्टीचाही अंतर्भाव होतो.
कापडचोपड - कापड, चोपफ्ड इ.
चुकलेमाकले - वूक, भूल इ.
चहाचिवडा  - वहा चिक्डा वगेरे
पाटीदप्तर - पाटी दप्तर वगेरे
गुरेढोरे - गुरे, ढोरे, अन्य जनावरे
भाजीभाकरी  - भाजी, भाकरी वगेरे
पानसुपारी - पान, सुपारी वगेरे
हळदकुंकू - हळद, कुंकू वगेरे
अंथरुणपांघरूण - अंथरूण, पांघरूण वगेरे
 चहाफराळ - वहा, फराळ वगेरे
चहापाणी - वहा, पाणी व फराळाचे पदार्थ
भाजीपाला - भाजी, पाला असेच पदार्थ

स्वाध्याय - पुढील समासिक शब्दांचा विग्रह करा -
वेणीफणी, मीठभाकर, घरदार, शेटसावकार, चढउतार, जा-ये. दे-घे, किडूकमिड्ूक, दगडबिगड, तंटाबिंटा, भांडणबिंडण, लहा
नसहान सुरव-दुःरव, सत्यासत्य, धर्माधर्म, चांगले वाईट, आठपंधरा, एकदोन, झाडेझुडपे.


४) बहुव्रीही  समास


या समासात समासातील पदापेकी कोणतेही पद प्रधान नसून त्या सर्व सामासिक पदापासून
त्यात असणाऱ्या प्रदांच्या शिवाय निराळ्याच पदाचा प्रामुरव्याने बोध होतो व तो सामासिक शब्द त्या निराळ्या पदाचे विशेषण
असतो. त्या समासाला बहुब्रिही समास असे म्हणतात.
उदा.,
दश्ानन - दश आहेत आनने ज्याला तो - रावण
लंबोदर - लंब म्हणजे मोठे आहे उदर ज्याचे तो - गणपती
टीप - ह्या समासाचा विग्रह करताना शेवटी संबंधी सर्वनाम येते व त्याची जी विभक्ती असते, तिचे नाव त्या समासास देतात.
अ) द्वितीया बहुत्रिही -

दशश आहेत आनने ज्याला तो - रावण (दशानन)
कर्म नाही ज्याला असे - अकर्म
अष्टपेलू - आठ पैलू आहेत ज्याला असा
प्राप्तधन - प्राप्त आहे धन ज्यास असा
अनंत - नाही अंत ज्याला तो
अनाथ - नाथ नाही ज्याला असा
अष्टभुजा - अष्ट आहेत भुजा जिला अशी
चोकोन - वार कोन आहेत ज्याला असा

आ) तृतीया बहुत्रिही -
जितकाम - जित आहे काम ज्याने
मुरलीधर - मुरली धारण केली आहे ज्याने असा
जितेंद्रिय - इंद्रिये जिंकली आहेत ज्याने असा (जित आहेत इंद्रिये ज्याने)

स्वाध्याय -
रवालील सामासिक शब्दांचे विग्रह करा -
कृतकृत्य, दत्तधन, लोककाम, जितकोप, युक्‍तायुध.

इ) चतुर्थी बहुत्रिही -
पंचमुरव - पाच आहेत गुरवे ज्याला
त्रिनेत्र - तीन डोळे आहेत ज्याला
चतुर्मुखव - चार मुरव आहेत ज्याला

ईई). पंचमी बहुत्रिही -
निर्धन - धन गेले आहे ज्याच्यापासून
निर्बल - बल नाही ज्याच्यापाशी असा
गलितरपर्ण - गलित आहेत पर्ण ज्यापासून


उ) वष्टी बहुत्रिही -
तपोबल - तप हेच बल आहे ज्याचे
लंबोधर - लंब आहे उदर ज्याचे

स्वाध्याय -
मानधन, शुलपाणी, तीर्थपाद, शशिशेरवर, चंद्रशेरवर, घारडोळ्या, गायमुरव्या, पांढरपेश्या, काळतोंड्या, चतुर्मुरव, चोकोन, दुप्पट, पाचपट या सामासिक शब्दांचे विग्रह करा.

ऊ) सप्तमी बहुत्रिही -
भीमादी - सथ्रीसम आहे आदि ज्यामध्ये
इंद्रादि - इंद्र आहे आदि ज्यामध्ये असे
नाक - न म्हणजे नाही, अक म्हणजे दु:र्व - ज्यांत तो - स्वर्ग
वीर पुरुष - वीर आहेत पुरुष ज्यांत असा - गाव

ए) नत्र  बहुत्रिही -
निस्तेज - नाही तेज ज्याच्यात असा जो तो
अनादी - नाही आदी ज्याला तो (परमेश्‍वर)
स्वाध्याय
सामासिक शब्द - अव्यय, अज्ञान, अनाथ, अकर्मक इ. यांचा विग्रह करा

ऐ) सह-बहुत्रिही -
सराग-राग (प्रेम) सह असे जेते (स किंवा सह हे अव्यय आरंभी येऊन हा समास होतो.
सदार - दारेने सह
स्वाध्याय - सहपरिवार, सपुत्र, सरूप, सवर्ण, सादर, सफल, सनाथ, समूल, सहकुटुंब यांचा विग्रह करून समास ओळरवा.

स्वाध्याय - गाडीघोडा, स्रीपुरूष, पहारेकरी, हस्ताक्षर, थट्टामस्करी, लोकप्रिय, परोपकार, समाजसेवा, सतराअठरा, शुभहस्त, र
जन, अनर्थ, कोटटोपी, ग्रंथालय, दुर्दशा, वसतीगृह, गुरारवी, आकाशदिवा, चक्मधारी, चिऊकाऊ, महापुरुष, इंद्रधनुष्य, काळरा
त्र. तटस्थ, परगाव, सर्वज्ञ, पायगुण, लेकसून, उदयास्त यांचा विग्रह करून समास ओळरवा.

Popular posts from this blog

पृथ्वीची आवरणे

महाराष्ट्रातील नद्या

केंद्रीय कार्यकारी मंडळ