शब्दांच्या जाती

 शब्दांच्या जाती




(२) शब्दांच्या जाती
शब्दांच्या मुरव्य जाती - शब्दांच्या मुरव्यत: दोन जाती असतात.
१) विकारी शब्द  २) अविकारी शब्द
१) विकारी शब्द - जे शब्द वाक्यात उपयोगात येताना त्यांच्या रुपात बहुधा कोणत्या तरी प्रकारचा बदल होतो. त्यांना विकारी शब्द
असे म्हणतात.
उदा - मनुष्य, ती, हसला इ.

२) अविकारी शब्द - ज्या शब्दांचा वाक्यात केव्हाही, कोणत्याही प्रकारचा बदल न होता उपयोग होतो, त्याना अविकारी शब्द
म्हणतात.
उदा - हळू, तर, परंतु, इ.

शब्दांची कार्ये आठ आहेत. म्हणजेच, शब्दांच्या जाती (कार्ये) आठ आहेत.
१) नाम
२) सर्वनाम
3) विशेषण
४) क्रियापद
५) क्रियाविशेषण अव्यय
६) शब्दयोगी अव्यय
७) उभयान्वयी अव्यय
८) केक्लप्रयोगी अव्यय
यापैकी पहिल्या चार जाती विकारी शब्दांच्या असून पुढच्या चार अविकारी शब्दांच्या जाती आहेत.

विकारी शब्दांच्या जाती - अ) नाम आ) सर्वनाम इ) विशेषण ई) क्रियापद

विकारी शब्दांच्या जाती
अ) शब्दांच्या जाती - नाम

नामे - नाम म्हणजे कोणत्याही वस्तूला दिलेले नाव.
नामांचे मुरव्य प्रकार तीन - अ) सामान्य नाम ब) विशेषनाम क) भाववाचकनाम

नामाचे पाच प्रकार.
आ) विशेषनाम,
ब) भाववाचकनाम,
क) समृहवाचक नाम,
 ड) पदार्थवाचक नाम किंवा द्रववाचक नाम,
 ई). सामान्यनाम

अ) सामान्य नाम - जे नाम एकाच जातीच्या अनेक वस्तूंना लागू पडते, ते सामान्यनाम
उदा. - पर्वत, मुलगी, घर, शाळा, फळ, फुल, गाय, घोडा, टेबल, खुर्ची इ.

ब) विशेषनाम - जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करून देते, ते विशेषनाम.
उदा. - सलोरव, स्नेहल, हिमालय, गंगा, कपिला इ.

क) भाववाचक नाम - ज्या नामामुळे, प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुणांचा, भावाचा किंवा धर्माचा बोध होतो, ते भाववाचक नाम.
उदा. - प्रामाणिकपणा, गोडी, धूर्तपणा, शोर्य, निर्भयता, कारुण्य इ.


स्वाध्याय - पुढील वाक्यातील नामे शोधा व लिहा -
१) सलोरव, पुस्तक आण,
२) शेतकरी जमीन नांगरतात.
3) या झाडाची फळे गोड आहेत.
४) स्नेहळच्या बोलण्यात गोडी आहे.


Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

केंद्रीय कार्यकारी मंडळ