वाक्‍य

वाक्‍य


वाक्‍य - पुऱ्या अर्थाच्या बोलण्यात दोन किंवा अधिक शब्द असतात.
केव्हा केव्हा एका शब्दाने देरवील वाक्याचा अर्थ पुरा झाला असे वाटते. जा. ये. बैस.
पण या प्रत्येक शब्दाच्या मागे तू" हा शब्द गुप्त असतो. पुर्‍या अर्थाच्या प्रत्येक बोलण्यास “वाक्य” असे म्हणतात. वाक्‍य हे पुर्‍या अर्थाचे बोलणे असते.

उदा:
(१) नदी वाहते. हे एक वाक्य आहे. यात दोन शब्द आहेत. (२) मांजर दृध पिते". हे ही एक वाक्य आहे. यात तीन शब्द आहेत.


स्वाध्याय : -
वाक्ये बनवा -
(१) शिक्षक मुलांना ............................
(२) ......................... दागिने घडवितो
(3) मी पुस्तक ......................
(४) ........................ वास येतो.
(५) पोपट पिंजऱ्यात ......................................
(६) ....................................... पाणी पितो.

वाक्याचे दोन भाग
प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल तरी बोलतो, व काहीतरी बोलतो, उदा. “शिवाजी राजा होता? या वाक्यात आपण शिवाजीबद्दल बोलतो, आणि शिवाजीबद्दल “राजा होता” असे बोलतो.
म्हणून प्रत्येक वाक्याचे दोन भाग होतात.
“कोणाबद्दल बोलतो" तो एक भाग आणि
“काय बोलतो” हा दुसरा भाग.

वाक्याचे मुरव्य भाग (अवयव) दोन आहेत -

(१) उद्देश्य
२) विधेय

१) उदृदेश्य - ज्याच्या संबंधी किंवा ज्याला उद्देशून आपण बोलतो, म्हणजे ज्याच्याविषयी वाक्यात काही सांगितलेले असते, म्हणजेच ज्याच्याविषयी वकता बोलतो, त्यास उद्देश्य म्हणतात.


२) विधेय - आपण उद्देश्याबदृदल जे काय बोलतो म्हणजेच जे विधान करतो त्यास विधेय म्हणतात.
उदा. शहाणा मुलगा अभ्यास करतो. या वाक्यात “शहाणा मुलगा” उद्देश्य आहे आणि “अभ्यास करतो” हे विधेय आहे.

उदा. - १) मुळे नियमितपणे शाळेत जातात.
२) नंदिता देवाळा नमस्कार करते.
3) दिपिका दिव्याला शिकविते.


(कोणाबद्दल बोलतो)                                                           (काय बोलतो)
          उद्देश्य                                                                         विधेय      
१) मुले                                                                   नियमितपणे शाळेत जातात.
२) नंदिता                                                                 देवाळा नमस्कार करते.
3) दिपिका                                                                 दिव्याला शिकविते.


स्वाध्याय -
(१) रवालील वाक्यातील उद्देश्य व विधेय ओळरवा -
आ) मिलाप रवेळतो. २) स्नेहल निबंध लिहिते. क) सलोरव अभ्यास करतो.
२) रवालील वाक्ये उद्देश्य घालून पुरी करा -
अ) ---- पराक्रमी होता. ब) ---- उडतात. क) ----- सूर्याभोवती फिरते.
3) रवालील वाक्ये विधेय घालून पुरी करा -
अ) माथेरानची हवा -----. ब) आमची शाळा ----. क) तुझे पत्र ---.


(४.१) वाक्यांचे प्रकार - १
वाक्यांचे प्रकार - मुरव्य प्रकार चार -
१) विधानार्थी वाक्य
२) आज्ञार्थी वाक्य
3) प्रश्‍नार्थक वाक्य
४) उद्गारार्थी वाक्य

१) विधानार्थी वाक्य - एरवाद्या गोष्टी विषयी विधान केले जाते. त्या वाक्य प्रकारास विधानार्थी वाक्य म्हणतात.

उदा. कावळयाने चिमणीची अंडी रवाल्ली.
विधानार्थी वाक्याचे दोन भाग पडतात. अ) होकारार्थी वाक्य ब) नकारार्थी वाक्य.

आ) होकारार्थी वाक्य - या विधानातून एरवाद्या कृतीचा होकार दर्शविला जातो.
उदा. १) मी दहीभात जेवीन. २) शिल्पाने कोमलला मारले.

ब) नकारार्थी वाक्य - या विधानातून एरवाद्या कृतीचा नकार दर्शविला जातो.
उदा. १) अक्षय परीक्षेच्या वेळी गोष्टीची पुस्तके वाचत नाही. २) मिलाप में महिन्यात अभ्यास करीत नाही.

२) आज्ञार्थी वाक्य - क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, प्रार्थना, उपदेश किंवा आशीर्वादाचा बोध होतो, त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

उदा. १) मिलाप, तू हे गोष्टीचे पुस्सक आवडीने वाच. २) मुलांनी मनापासून अभ्यास करावा.
3) सलोरव, तू मजेत प्रवास करून ये.

3) प्रश्‍नार्थक वाक्य - या प्रकाराची वाक्ये ही प्रश्‍न सूचक असतात. या वाक्‍यातून प्रश्‍नाचा बोध होतो.


उदा. १) तू किती वाजता शाळेत जाणार ? २) अशोक काय करतो 2?


४) उदृगारार्थी वाक्य - ज्या वाक्यात एरवाद्या भावनेची तीव्रता उद्‌्गारातून स्पष्ट होते, त्या वाक्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. 

या वाक्यात किती, केवढा, काय. इ. शब्द प्रयोग असतात.

उदा. १) काय ही बडबड / २) अरे बापरे / केवढा मोठा प्राणी हा / यात आनंद, आश्चर्य दुःरव अशा एरवाद्या भावनेतून
निघणारे उद्गार आलेले असतात.
मूळ वाक्य रचना बदलून सांगितल्या प्रमाणे लिहिणे हेच वाक्य रूपांतर.

================================

वाक्ये तीन प्रकारची आहेत -
१) केवल वाक्‍य
२) मिश्र वाक्य
3३) संयुक्‍त वाक्य

१) केवल वाक्य - ज्या वाक्यात एकच उद्देश्य असून एकच क्रियापद असते, त्यास केवल वाक्य असे म्हणतात. केवल वाक्याला शुद्ध वाक्य असेही म्हणतात.

उदा. अ) मिलाप शाळेत जातो. ब) स्नेहलने सुंदर चित्र काढले. क) सलोरव नियमितपणे सायकल चालवितो. या तीनही
वाक्यात प्रत्येकी एकच उद्देश्य असून एकच क्रियापद आहे.

२) मिश्र वाक्य - या वाक्यात एक मुरव्य वाक्य असून, त्यावर अवलंबून असणारी एक किंवा जास्त गोण वाक्ये असतात. ज्या वाक्यात एक मुरव्य उद्देश्य व एक मुरव्य विधेय असते, आणि दोन किंवा अधिक क्रियापदे असतात, त्यास मिश्रवाक्य असे म्हणतात.
मिश्र वाक्यातील मुरव्य उद्देश्य व मुरव्य विधेय यानी होणारे जे वाक्य त्यास प्रधान वाक्य असे म्हणतात. आणि इतर वाक्‍्यांस गोण वाक्‍य किंवा अवलंबी वाक्य असे म्हणतात.

उदा. १) “जो मनुष्य चोरी करतो, त्यास शिक्षा होते.
यात “त्यास शिक्षा होते हे मुरव्य वाक्य असून “जो मनुष्य चोरी करतो” हे त्यावर असलंबून असणारे गोण वाक्‍य होय.

२) “मी आता शाळेत जाणार” असे सलोरव म्हणाला.
यात “सलोरव म्हणाला” हे मुरव्य वाक्य असून “मी आता शाळेत जाणार” हे त्यावर अवलंबून असणारे गोण वाक्‍य होय.

३) संयुक्‍त वाक्य - ज्या वाक्यामध्ये दोन अथवा अधिक प्रमुरव वाक्ये असतात, त्यास संयुक्‍त वाक्य असे म्हणतात.
उदा. सलोरव घरी आला आणि झोपला. या वाक्यात “सलोरव घरी आला”, व “आणि झोपला, ही दोन्ही मुरव्य वाक्ये आहेत.
काही संयुक्‍त वाक्यात केवल व मिश्र वाक्यांचा संयोग झालेला असतो. हे संयोग तीन प्रकारचे असतात -
१) केवलकेवल संयोग
२) मिश्रमिश्र संयोग
3) केवलमिश्र संयोग

१)केवलसंयुक्‍त वाक्य - केवलकेवल संयोग म्हणजेच दोन किंवा अधिक केवल वाक्यांचा संयोगाने होणारे वाक्य. त्यास
केवलसंयुक्‍त वाक्य असे म्हणतात.
उदा. मिलाप आला आणि लगेच गेला. या वाक्यात दोन केवल वाक्यांचा संयोग झाला आहे.

२) मिश्रसंयुक्‍त वाक्य - मिश्रमिश्र संयोग म्हणजेच दोन किंवा अधिक मिश्र वाक्यांच्या संयोगाने होणारे वाक्य. त्यास मिश्र संयुक्‍त
वाक्‍य असे म्हणतात.
उदा.
जो श्रीसंत असतो त्याला विद्येची गोडी नसते आणि ज्याला विद्येची गोडी असते त्याला अनुकूलता नसते. या वाक्यात दोन मिश्र वाक्यांचा संयोग झालेला आहे.

३) केवलमिश्र संयुक्‍त वाक्य - केवलमिश्र संयोग म्हणजेच एक किंवा अधिक केवल वाक्ये आणि एक किंवा अधिक मिश्र वाक्ये
ह्यांच्या संयोगाने होणारे वाक्य. यास केवलमिश्र संयुक्‍त वाक्य असे म्हणतात.

उदा. श्रीमंताला विद्या नको आणि ज्याला विद्या हवी असते त्याला शिकण्यापुरताही पैसा मिळत नाही.

विशेष सूचना : संयुक्‍त वाक्यांचे हे पोटभेद सांगण्याची विशेष चाल नाही. तर या वाक्यांस सरसकट संयुक्‍त वाक्‍्येच म्हणण्याचा परिपाठ आहे.




Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

केंद्रीय कार्यकारी मंडळ