वाक्याचे पृथकरण

 वाक्याचे पृथकरण

पुर्‍या अर्थाच्या शब्द समृहास वाक्‍य म्हणतात. वाक्यात दोन किंवा अधिक शब्द असतात. प्रत्येक वाक्यात कर्ता व क्रियापद ही असतात. क्रियापद सकर्मक असल्यास वाक्यात कर्म असते. क्रियापद अकर्मक असल्यास वाक्यात कर्म नसते.वाक्यात कर्ता, कर्म व क्रियापद याशिवाय इतर शब्दही असतात.

-  कर्त्याविषयी जास्त माहिती सांगणारे शब्द कर्त्यापूर्वी येतात, कर्माविषयी जास्त माहिती सांगणारे शब्द कर्मापूर्वी येतात.व क्रियापदाविषयी जास्त माहिती सांगणारे शब्द क्रियापदापूर्वी येतात.

कर्त्याविषयी शब्द व कर्ता. (कर्म असल्यास) कर्माविषयी शब्द व कर्म, क्रियापदाविषयी शब्द व क्रियापद अशी साधारणत:वाक्यरचना असते.

उदा. रानटी पोपट झाडावरील पिकलेला पेरू भरभर रवातो.
या वाक्यात “रानटी पोपट हे उद्देश्य व “झाडावरील पिकलेला पेरू भरभर रवातो” हे विधेय.
आता प्रत्येक भागाची पुन्हा फोड करू. कर्ता व कर्त्याचा विस्तार ही उद्देश्य भागात येतात. कर्म व कर्माचा विस्तार ही विधेय भागात येतात व क्रियापदाचा विस्तार व क्रियापदही विधेय भागातच येतात.

आ) उद्देश्य भागाचे दोन भाग पडतात.
१) कर्त्याचा विस्तार
२) कर्ता

ब) विधेय भागाचे चार भाग पडतात.
१) कर्माचा विस्तार,
२) कर्म,
3) क्रियापदाचा विस्तार,
४) क्रियापद.

अशा रीतीने वाक्याची फोड करणे यासच वाक्यपथकृकरण असे म्हणतात. वाक्यपथकृकरण म्हणजे वाक्याचे सर्व भागनिरनिराळे करणे. तसेच वाक्याचे मुरव्य भाग व पोट-भाग नीट ओळखून ते व्यवस्थितपणे लिहून दारवविणे यालाच वाक्यपृथकृकरण म्हणतात.

वाक्ये -
१) आमचा काळा घोडा फार जोराने पळाला.
२) रानटी पोफ्ट झाडावरील पिकलेला पेरू भरभर रवातो.
3) आमचे छोटे बाळ हळूहळू चालते.
४) शेतकऱयांचे बैल जड नांगर नेटाने ओढतात.

रवालील तक्त्यात उद्देश्य व विधेय असे दोन भाग पाडून वरील वाक्ये लिहू -
तक्ता
१) उद्देश्य                                                                     २) विधेय
१) आमचा काळा घोडा -                                      फार जोराने पळाला.
२) रानटी पोफ्ट -                                   झाडावरील पिकलेला पेरू भरभर रवातो.
3) आमचे छोटे बाळ -                                         हळूहळू चालते.
४) शेतकऱयांचे बैल -                               जड नांगर नेटाने ओढतात.



Popular posts from this blog

पृथ्वीची आवरणे

महाराष्ट्रातील नद्या

केंद्रीय कार्यकारी मंडळ