अविकारी शब्द

अविकारी शब्द 

अविकारी शब्दात व्यय म्हणजे बदल होत नाही. म्हणून त्यांस अव्यये म्हणतात. अविकारी शब्दांचा वाक्यात केंव्हाही  व कोणत्याही प्रकारचा बदल न करता नेहमी उपयोग केला जातो.
अविकारी शब्दांचे प्रकार
अविकारी शब्दांचे चार प्रकार आहेत.
उ) क्रिया विशेषण अव्यये,
ऊ) उभयान्वयी अव्यये,
ए) शब्दायोगी अव्यये,
ऐ) केवलप्रयोगी अव्यये


उ) क्रिया विशेषण अव्यये, -
 क्रियेचे स्थल, काल, रीति. संरव्या इ. कोणत्याही प्रकारचे वैशिष्टय दारवविणारा जो अविकारी शब्दआहे त्याला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात.
क्रियाविशेषण अव्यये अर्थदृष्ट्या सामान्यतः चार प्रकारची आढळतात

अ) स्थलवाचक
 ब) कालवाचक
क) रीतिवाचक
ड) परिमाणवाचक किंवा संरव्यावाचक.


अ) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये - 
क्रिया कोठे घडली, तिचे स्थळ किंवा ठिकाण दर्शविणारा शब्द.

उदा. येथे रवेळू नका. आमची शाळा घरापासून जवळ आहे. येथे, तेथे, पलीकडे, सभोवार, वर, रखवाली, आत, मागे, पुढे इ. शब्द त्यांच्या वाक्यातील क्रिया कोठे घडते या बद्दलची विशेष माहिती सांगतात.


ब) कालवाचक क्रियाविशेषण अव्यये - क्रिया घडण्याचा काळ दारवविणारे शब्द.
उदा.
१) हल्ली दहिसरला विजेचे दिवे आलेले आहेत.
२) गोकर्णला पूर्वी मातीचे रस्ते होते.
3) दिवाळीत मुले आठवडाभर फटाके वाजवितात.
 ४) आम्ही वारंवार समुद्रावर फिरायला जातो.
केव्हा? हा प्रश्‍न क्रियापदास विचारल्यास - आज, उद्या, यंदा, जेव्हा, महिनाभर, वारंवार, आता; पूर्वी, मागे, सकाळी, रात्री, नेहमी, पुन्हा, दररोज, वेळोवेळी, क्षणोक्षणी इ. उत्तरे मिळू शकतात.


क) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये - क्रिया घडण्याची रीत दारवविणारे शब्द. कसा? कशी? कसे? या प्रश्‍नानी क्रियापदाकडून येणारी उत्तरे.
उदा. असे, तसे, जलद, सावकाश, हळूहळू, आपोआप, झटपट, रवरोरवर, रवचित, उगीच, फुकट, मुद्दाम, व्यर्थ
१) मी सावकाश जेवते.
२) तो चटकन दुकानात जाऊन आला.
3) सलोरव फार जलद चाततो.


ड) परिमाणवाचक (किंवा संस्व्यावाचक) क्रियाविशेषण अव्यये - क्रिया किती प्रमाणात घडली, हे सांगणारे परिमाणवाचक शब्द.
किती? या प्रश्‍नाने क्रियापदाकडून येणारे उत्तर.
उदा. किंचित, अत्यंत, थोडा, मुळीच, भरपूर, अतिशय, काहीसा, जरा, पूर्ण बिलकुल, कमी, अधिक, इ.
१) सलोरव मुळीच झोपला नाही. २) मिलापने पारिजातकाची भरपूर फुले आणली.
स्वाघ्याय - पुढील वाक्यातील क्रियाविशेषणे शोधून लिहा --
१) सलोरव जलद चाततो.
२) स्नेहलने तीनदा हे पुस्तक वाचले.
३) ही गोष्ट ऐकून मिलाप खप हसला.
४) नेहा भरभर बोलते.


ऊ) उभयान्वयी अव्यये


 दोन शब्द किंवा दोन वाक्ये याना केवळ जोडण्याचे काम करणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यये 
म्हणतात. ही अव्यये दोन वाक्ये जोडण्याचे कार्य करतात.
उदा. त्यासाठी, आणि, व. शिवाय, अनू, परंतु, पण, अथवा, किंवा, वा, म्हणून, कारण, की, म्हणजे, तर, जर, तरी, यासाठी,इ. शब्दांचा वापर करतात.

उदा.
१) स्नेहल लक्षदेऊन अभ्यास करते म्हणून तिचा पहिला नंबर येतो.
२) यश मिळावे म्हणून सलोरव खूप मेहनत करतो.
3) मिलापचा पाय दुरवत होता तरी तो शाळेत गेला.
४) कोमळ आणि शिल्पा एकाच वयाच्या आहेत.



ए) शब्दायोगी अव्यये


 नाम किंवा दुसरा एरवादा विकारी शब्द त्याला जोडून येऊन त्याचा वाक्यातील इतर शब्दाशी संबंध
दारवविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा. मनुष्य हा पैशापेक्षा गुणाने अधिक श्रीमंत असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिक्षक काय सांगतात ह्याकडे अधिक लक्ष द्यावे. पावलावर, घरावर, झाडापुढे येईपर्यंत, केल्यामुळे इ.
सूचना -
काही स्थलवाचक व कालवाचक अव्यये क्रियाविशेषण अव्ययेही असतात व शब्दयोगी अव्ययेही असतात. ज्यावेळी ती नामापुढे त्यास जोडून येतात, तेव्हा ती शब्दयोगी अव्यये असतात. आणि जेव्हा ती स्वतंत्र असून कशासही जोडली न जाता
क्रियेचा गुण दारववितात, तेव्हा ती क्रियाविशेषण अव्यये असतात. 
यातील फरक पहा -
शब्दयोगी अव्यये क्रियाविशेषण अव्यये
१) तो झाडावर आहे. तो हात वर करतो.
२)  दिव्यारवाली बसून वाचू नये. मी रवाली येतो.
3) दूघ पिण्यापुर्वी दात घासावे. पूर्वी तो खूप रवेळत होता.
४) जेवणानंतर चूळ भरावी. ती नंतर डॉक्टरकडे गेली.


स्वाघ्याय : - पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यये शोधून लिहा :-
१) शिंपी पक्षी घरट्याबाहेर आला.
२) मुले बाकावर बसली.
3) मिलाप येईपर्यत तू थांब.
४) तुला नलिहिल्याशिवाय चालणार नाही.
५) आमची बस दुकानाजवळ थांबते.


ऐ) केवलप्रयोगी अव्यये



उद्गारवाचक अव्यय किंवा केवलप्रयोगी अव्यय -
मनाला एकाएकी होणारे हर्ष, शोक, तिरस्कार, आश्‍चर्य इ. विकार दर्शविण्यासाठी जे शब्द एकदम
उच्चारले जातात, अशा अविकारी शब्दांना केवल प्रयोगी किंवा उद्गार वाचक अव्यये असे म्हणतात. आपल्या मनात जितक्‍या
प्रकारच्या भावना उद्‌भवतात तितके त्यांचे प्रकार संभवतात.

१) हर्षदर्शक - वाहवा, अहाहा, वा वा: अहा, आहो.
२) शोकदर्शक - अरेरे, अगाई, हायहाय, शिवशिव. रामराम, देवारे. आईआई.
3) आशश्‍चर्यदर्शक - अबब, अरे बापरे. अय्या, अगबाई.
४) विरोधदर्शक - छे छट, अंहं. उह. छी, छीछी.
५) तिरस्कारदर्शक - छी, थू, शी:, इश्श, अहाहा.
६) प्रशंसादर्शक - वाहवा, शाबास, भले, ठीक.
७) स्वीकारदर्शक (संमतीदर्शक)  - जी. हां. ठीक. बरे, होय.
८) संबोधनदर्शक - अरे, अहो, अग, ए. रे.

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

केंद्रीय कार्यकारी मंडळ