महाराष्ट्र - प्राकृतिक




प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश व पठारी प्रदेश असे तीन प्रमुख विभाग पडतात. राज्याचा बहुतांश भूभाग बेसाल्ट या अग्निज खडकांनी बनलेला आहे.

(१) किनारपट्टीचा प्रदेश
राज्याच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेला
किनारपट्टीचा प्रदेश आहे. या चिंचोळ्या भागास कोकण म्हणतात. सह्याद्रीपासून थेट
समुद्रकिना-यापर्यंत अनेक डोंगररांगा गेल्या आहेत. त्यामुळे हा सलग मैदानी भाग नाही. डोंगररांगांमुळे
महाराष्ट्राचा सागरी किनारा ब-याच अंशी खडकाळ व दंतूर आहे. कोकण किनाच्यावर अनेक पुळणांची व
खाड्यांची निर्मिती झाली आहे. या प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होते. कोकण प्रदेशाची रुंदी
उत्तरेकडे जास्त आहे.


(२) पर्वतीय प्रदेश

सह्याद्री पर्वत : सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या किनाच्यास समांतर असलेल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे ९०० मी आहे. सर्वसाधारणतः ही उंची उत्तरेकडे
कमी होत जाते. हा पर्वत उत्तर-दक्षिण पसरलेला आहे. या पर्वताचा पश्चिमेकडील उतार तीव्र असून
पूर्वेकडील उतार त्यामानाने मंद आहे. या पर्वतरांगेत अनेक उंच शिखरे आहेत. त्यांतील कळसूबाई हे।
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर आहे. त्याची उंची १६४६ मी आहे. कोकणातील व पठारावरील प्रमुख
नद्यांचा उगम सह्याद्री पर्वतातच झालेला आहे. कोकण व पठार यांच्या दरम्यान प्रवास करताना
सह्याद्री पर्वत ओलांडावा लागतो. यासाठी पर्वतात वळणावळणांचे रस्ते तयार केलेले आहेत, त्यांना घा
रस्ते असे म्हणतात.

सातपुडा पर्वत : महाराष्ट्राच्या उत्तर भागात
सातपुडा पर्वतरांग आहे. तिचा पश्चिमेकडील भाग नंदुरबार जिल्ह्यात येतो. यात तोरणमाळ पठार व
अस्तंभा डोंगर हे जास्त उंचीचे भाग आहेत. यांपैकी अस्तंभा हे सर्वांत उंच शिखर आहे. त्याची उची १३२८ मी आहे. या पर्वताच्या मध्यभागी रावेर-ब-हाणपूर दरम्यान खिंड आहे. तिला ब-हाणपूर खिड असे
म्हणतात. या पर्वताच्या पूर्वेकडे गाविलगड डोंगररांग असून ती अमरावती, अकोला जिल्ह्यांत पसरली आहे.

(३) पठारी प्रदेश 

महाराष्ट्र पठार
सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश हा दख्खनच्या पठाराचा भाग असून त्याला महाराष्ट्र पठार असे म्हणतात. या पठाराची सर्वसाधारण उंची ६०० मी आहे. या पठारावर डोंगररांगा आणि
नद्यांची खोरी आहेत. सह्याद्री पर्वतातून निघालेल्या सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्र-बालाघाट व महादेवडोंगररांगांचा समावेश या पठारात होतो. 

या रांगांमुळे अनुक्रमे गोदावरी, भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. सातपुडा पर्वत आणि
सातमाळा-अजिंठा डोंगररांगांच्या दरम्यान तापी नदीचे खोरे आहे. महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग सखल आहे. वर्धा जिल्ह्याचा पूर्वेकडील हा भाग सखल मैदानी प्रदेश असून त्याची सरासरी उंची ३०० मीटर आहे. महाराष्ट्र
पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

केंद्रीय कार्यकारी मंडळ