महाराष्ट्र- हवामान

महाराष्ट्र- हवामान






किनारपट्टीचा प्रदेश : कोकणातील हवेचे तापमान जास्त असते म्हणून तेथील हवामान उष्ण आहे. समुद्र जवळ असल्याने हवेत बाष्पाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे हवा दमट राहते. तसेच दिवसभरातील आणि विविध ऋतूमधील तापमानांत जास्त फरक नसतो, म्हणून हवामान सम आहे. त्यामुळे कोकणातील हवामान उष्ण, दमट आणि सम आहे.

पर्वतीय प्रदेश : उंचीनुसार तापमानात घट होत
जाते, या नियमानुसार सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांमधील जास्त उंचीच्या भागात तापमान कमी असते. त्यामुळे या पर्वतरांगांमधील उंच भागात थंड हवेची ठिकाणे आहेत. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये
माथेरान, लोणावळा, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर, आंबोली इत्यादी थंड हवेची ठिकाणे आहेत, तर
सातपुडा पर्वतरांगांमध्ये तोरणमाळ, पाल, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे आहेत.

पठारी प्रदेश : पठार हा मध्यम उंचीचा भाग आहे. त्यामुळे तेथील हवामान उष्ण असते. तो
समुद्रापासून दूर असल्याने पठारावर दिवसभरात आणि विविध ऋतूमधील तापमानात फरक जास्त असतो, म्हणून तेथील हवामान विषम असते. तसेच हवेत बाष्प कमी असल्यामुळे हवा कोरडी असते. त्यामुळे पठारावरील हवामान उष्ण, कोरडे आणि विषम असते.

पर्जन्य : जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून
नैर्ऋत्य मोसमी वारे वाहतात. हे वारे अरबी समुद्रावरून येतात. जलभागावरून आल्याने ते बाष्पयुक्त असतात.
या वायांपासून महाराष्ट्रात पर्जन्य होतो. हे वारे राज्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतरांगांनी अडवले जातात. यामुळे कोकणात आणि सह्याद्री घाटमाथ्यावर भरपूर पर्जन्य होतो. त्यांतील
आंबोली हे राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे  

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जाताना हे वारे कमी उंचीवर येतात. तेथील हवेचे तापमान जास्त
असल्याने या वा-याचे तापमानही वाढू लागते. त्यामुळे
ते जास्त बाष्प सामावून घेऊ शकतात. परिणामी सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी होत
जाते. डोंगर किंवा पर्वतामुळे तयार होणा-या अशा

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

केंद्रीय कार्यकारी मंडळ