नोकरशाही
नोकरशाही
सनदी सेवांचे प्रकार :
भारतात सनदी सेवांचे
प्रमुख तीन प्रकार आहेत.
(१) अखिल भारतीय सेवा : भारतीय
प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा
(IPS) आणि भारतीय वन सेवा (IFS) यांचा यात
समावेश होतो.
(२) केंद्रीय सेवा : या केंद्रशासनाच्या
अखत्यारीतील असतात. भारतीय विदेश सेवा
(IFS), भारतीय महसूल सेवा (IRS) इत्यादींचा
त्यात समावेश असतो.
(३) राज्यसेवा : या राज्यशासनाच्या अखत्यारीत
असतात. उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी,
तहसीलदार इत्यादी प्रशासकीय अधिकारी
स्पर्धापरीक्षांमधून निवडले जातात.
गुणवत्ता व कार्यक्षमता या निकषांच्या आधारे
सनदी सेवकांची निवड व्हावी म्हणून भारतीय
संविधानाने लोकसेवा आयोगासारख्या स्वतंत्र यंत्रणा
निर्माण केल्या आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोग
(UPSC) अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी
स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवार निवडते व त्यांची
नेमणूक शासन करते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग
(MPSC) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षांद्वारा उमेदवार निवडते व त्यांच्या नेमणुकीची
शिफारस शासनाला करते.
नोकरशाही आणि सनदी सेवांमधूनही समाजातील
सर्व घटकांना संधी मिळावी म्हणून अनुसूचित जाती
व अनुसूचित जमाती, महिला, इतर मागासवर्गीयांना
आणि दिव्यांगांना आरक्षण देऊन सेवांमध्ये येण्याची
संधी दिली आहे. सामाजिक विषमतेमुळे दुर्बल घटक
सनदी सेवेतील संधींपासून वंचित राहून नयेत म्हणून
ही तरतूद करण्यात आली आहे.