क्रियापदांचा अर्थ सांगणारी वाक्ये
क्रियापदांचा अर्थ सांगणारी वाक्ये
१) मुलगी रोज भाजी रवाते.२) मुलांनो, रोज भाजी रवा.
3) मुलांनी रोज भाजी रवावी.
४) मुलांनी रोज भाजी रवाल्ली तर तब्येत चांगली राहते.
पहिल्या वाक्यात कर्ता क्रिया करतो यात फक्त काळाचा बोध होतो. पुढील तीन वाक्यावरून काळाचा बोध होत नाही.
पणसांगणाऱ्याचा हेतू समजतो. दुसर्या वाक्यात मुलांना उपदेश केला आहे. तिसर्या वाक्यात कर्तव्य सांगितले आहे. आणि चोथ्या वाक्यात अट सांगितली आहे
म्हणून २, 3, ४ या वाक््यांवरून क्रियेच्या काळाचा बोध होत नसून सांगणाऱर््याचा उद्देश किंवा हेतू
समजतो, यालाच व्याकरणात अर्थ म्हणतात.
क्रियापदाचे बोलणाऱ्याच्या मुरव्य हेतूवरून चार अर्थ मानतात -
अ) स्वार्थ ब) आज्ञार्थ क) विध्यर्थ ड) संकेतार्थ
(अ) स्वार्थ - क्रियापदाला केवळ स्वत:चा अर्थ समजतो. वर्तमान, भूत, भविष्य या काळात क्रिया करणाऱ्याचा हेतू नुसते विधान
करण्याचा असतो. क्रियापदाची सर्व काळातील ही स्वार्थी रूपे होत.
उदा. १) मी अभ्यास करतो. (वर्तमानकाळ) २) मी अभ्यास केला. (भूतकाळ) 3) मी अभ्यास करीन. (भविष्यकाळ)
४) मी अभ्यास करणार नाही. (नकार)
(ब) आज्ञार्थ - मुलांनो, रोज भाजी रवा". या वाक्यातील रवा" या क्रियापदावरून सांगणाऱ्याचा हेतू साधे विधान करावयाचा नसून
आज्ञा किंवा उपदेश करावयाचा आहे. क्रियापदावरून आज्ञा, विनंती, उपदेश किंवा आशीर्वाद देण्याचा हेतू दिसला तर त्याला
आज्ञार्थ असे म्हणतात.
उदा. १) माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. (आज्ञा) २) परमेश्वर तुम्हाला सुरवी ठेवो. (आशीर्वाद) 3) देवा मला आजारपणातून मुक्त
कर. (प्रार्थना) ४) पैसे जपून वापरा. (विनंती)
(क) विध्यर्थ - क्रियापदावरून कर्तव्य, इच्छा, योग्यता, तर्क, शक्यता, असा कोणता तरी बोध होतो.
उदा. १) आपण नेहमी एकमेकांशी प्रेमाने वागावे (कर्तव्य) २) मला चांगले मित्र मिळावेत. (इच्छा)
3) तो घरी पोचला असावा. (तर्क) ४) मिलापच्या चित्राला बक्षीस मिळावे. (शक्यता)
कर्तव्य यालाच विधी म्हणतात. म्हणून ही क्रियापदे विध्यर्थ होय
(ड) संकेतार्थ - यात क्रियापदावरून एक गोष्ट दुसरीवर अवलंबून आहे. अशा प्रकारचा बोध होतो. संकेत म्हणजे अट. संकेत होण्यास दोन वाक्ये लागतात. ती “जर-तर” अव्ययांनी जोडलेली असतात.
उदा. जर मी मंद वार्याची झुळूक झाले असते तर कळीला हळूच स्पर्श केला असता. कघी कघी “जर हे अव्यय गाळून वाक्ये लिहितात.
उदा. झाडाला फुले आली तर मी ती देवाला वाहीन.