महाराष्ट्र खनिजसंपत्ती व उर्जा साधने
खनिजसंपत्ती
महाराष्ट्रातील खनिज
संपत्ती पूर्व व नैऋत्य भागांत एकवटलेली आहे. याचे
प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राचा बराचसा भाग बेसाल्ट
या अग्निज खडकाचा बनलेला आहे. या खडकात
खनिजसंपत्ती फारशी आढळत नाही.
महाराष्ट्राच्या नैर्ऋत्य भागात जांभा खडक आढळतो.
या खडकात बॉक्साईट, मॅगनीज यांसारखी खनिजे
आढळतात, तर पूर्व भागात रूपांतरित खडकात मॅगनीज,
चुनखडक, लोहखनिज इत्यादी खनिजे आढळतात.
खनिजे ही भूपृष्ठाखालून किंवा भूपृष्ठावर जमीन
खोदून खडकांमधून काढली जातात. या व्यवसायाला
खाणकाम म्हणतात.
ज्या भागात खडकांमध्ये विशिष्ट खनिजे मोठ्या
प्रमाणावर सापडतात, ग भागात खाणकाम व्यवसाय
सुरू केला जातो.
महाराष्ट्रात आढळणारी प्रमुख खनिजे, त्यांचा
उपयोग आणि ही खनिजे कोणकोणत्या जिल्ह्यांत
आढळतात, ते व खालील तक्त्याच्या
साहाय्याने पाहू.
खनिजे उपयोग
प्रामुख्याने आढळणारे जिल्हे
मँगनीज
लोखंड व पोलाद उद्योगांत, बॅटरी, रंग, जंतुनाशके,
काचसामान व औषध निर्मितीसाठी
नागपूर, गोंदिया, भंडारा, सिंधुदुर्ग
लोहखनिज
शुद्ध लोखंड व पोलाद निर्मितीसाठी
चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया,
सिंधुदुर्ग
बॉक्साईट
अॅल्युमिनिअम निर्मितीसाठी
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड
चुनखडक
रसायन व सिमेंट उठ्योगांत, बांधकामासाठी लागणारा चुना तयार करण्यासाठी
गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर
क्रोमाइट
धातू उद्योग व रसायन उद्योगांत, किमती खड्यांवर प्रक्रिया
भंडारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी
डोलोमाइट
लोखंड व पोलाद निर्मितीसाठी
यवतमाळ, रत्नागिरी
सिलिका
काचकामासाठी
सिंधुदुर्ग
ऊर्जासाधने
ज्या साधनांपासून ऊर्जा मिळते त्यांना ऊर्जासाधने
हणतात. ऊर्जेचा वापर आपण विविध कामांसाठी
तो. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वाय,
सर्यकिरण, वारा इत्यादींद्वारे आपण ऊर्जा प्राप्त करतो.
पारंपरिक ऊर्जासाधने
पूर्वीपासून दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक
नाय व वाहते पाणी यांचा ऊर्जासाधने म्हणून वापर
केला जात आहे, म्हणूनच या ऊर्जासाधनांना पारंपरिक
ऊर्जासाधने म्हणतात.
(१) दगडी कोळसा
दगडी कोळशाचा उपयोग
प्रामुख्याने औष्णिक विद्युत निर्मिती व लोह-पोलाद ।
कारखान्यांसाठी केला जातो.
(२) खनिज तेल व नैसर्गिक वायू
मुंबईजवळ अरबी समुद्रात ‘मुंबई हाय' व 'वसई
हाय ही नैसर्गिक वायू व खनिज तेलक्षेत्रे आहेत. उरण
बंदराजवळ नैसर्गिक वायू साठवला जातो. खनिज तेल
शुद्ध करून पेट्रोल, डिझेल, रॉकेल इत्यादी उत्पादने
मिळतात. त्यांचा उपयोग इंधन म्हणून केला जातो.
मानव या ऊर्जासाधनांची निर्मिती करू शकत
नाही. त्यांचे साठेही मर्यादित आहेत. वापरानंतर त्यांचे
साठे नष्ट होतात. तसेच त्यांच्या ज्वलनाने मोठ्या
प्रमाणावर हवेचे प्रदूषणही होते.
अपारंपरिक ऊर्जासाधने
अलीकडच्या काळात पारंपरिक ऊर्जासाधनांना
पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जासाधनांचा वापर सुरू
पा झाला आहे. सूर्यकिरण, वारा, विघटनशील टाकाऊ
के पदार्थ, सागरी लाटा, युरेनियम, थोरीयम सारखी खनिजे
ही अपारंपरिक ऊर्जासाधने आहेत,
(१) सौरऊर्जा : सूर्यापासून मिळणाच्या उष्णतेच्या
साहाय्याने सौरऊर्जा प्राप्त होते. या ऊर्जेचा उपयोग पाणी
तापवण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी, काही ठिकाणी
रस्त्यावरील दिवे लावण्यासाठी केला जातो. महाराष्ट्रात
सौरबंब, सौरचूल, सौरकुकर यांचा वापर वाढत आहे
(२) पवनऊर्जा : वान्याच्या वेगाचा वापर करून
वीजनिर्मिती केली जाते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या
भागांत पवनऊर्जा निर्मिती केंद्रे आहेत. त्यांपैकी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे व विजयदुर्ग ; सातारा
जिल्ह्यातील चाळकेवाडी ही प्रमुख केंद्रे आहेत.
त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, अहमदनगर इत्यादी
जिल्ह्यांतही पवनऊर्जा निर्मिती केंद्रे आहेत.
(३) टाकाऊ पदार्थापासून मिळणारी ऊर्जा :
जनावरांचे मलमूत्र, घरगुती व शेतीतील टाकाऊ पदार्थ
यांपासूनदेखील ऊर्जानिर्मिती केली जाते. बायोगॅस हे
त्याचे एक उदाहरण आहे. त्याचा वापर विविध
ठिकाणी स्थानिक स्तरावर वाढत आहे.
राज्यात सागराच्या लाटांपासून वीजनिर्मितीचे
प्रयत्न चालू आहेत.
वीजनिर्मिती : वाहते पाणी, खनिज तेल,
नैसर्गिक वायू, दगडी कोळसा व अणुशक्ती याचा
उपयोग प्रामुख्याने वीजनिर्मितीसाठी केला जातो.
महाराष्ट्रातील वीजनिर्मितीसाठी अणुशक्तीचा वापर
अतिशय मर्यादित स्वरूपात आहे, तर दगडी कोळसा
व खनिज तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.