महाराष्ट्र : वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती

महाराष्ट्र : वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती
नेनैसर्गिक वने ही महत्त्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे.
वनांची वाढ ही सूर्यप्रकाशाबरोबरच त्या प्रदेशातील
जमीन, हवामान व पाण्याची उपलब्धता या नैसर्गिक
घटकांवर अवलंबून असते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या
भागांत या घटकांत भिन्नता असल्याने वनप्रकारात
भिन्नता आढळते.  वनप्रकार, त्यांचे
वितरण व पर्जन्याचा सहसंबंध असतो.

वनसंपत्ती
(१) सदाहरित वने : ज्या भागात ३००० मिमी
पेक्षा जास्त पर्जन्य होतो, त्या भागात सर्वसाधारणतः
ही वने आढळतात. अनेक प्रकारचे वृक्ष या वनांत
असल्याने ही वने वर्षभर हिरवी दिसतात, म्हणून त्यांना
सदाहरीत वने म्हणतात. सह्याद्री पर्वताच्या दक्षिण
भागात सदाहरित वने
आढळतात. या वनांत
वृक्षांची विविधता जास्त
आढळते. नागचंपा, जांभूळ,
फणस, तेल्याताड इत्यादी |
प्रमुख वृक्ष तसेच वेत व
बांबू या वनस्पती येथे
आढळतात.

(२) निम सदाहरित वने :
१००० ते ३०००
मिमी पर्जन्य होणाच्या
प्रदेशात सर्वसाधारणतः ही
वने आढळतात. या
वनांतील वृक्षांतील विविधता सदाहरित
वनांपेक्षा कमी असते. सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिमेकडील
उताराच्या भागांत ही वने आढळतात. येथे आंबा,
फणस, ऐन, किंजळ, कदंब, शेवरी इत्यादी वृक्ष प्रमुख
आहेत. आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे.
आंबा
(३) पानझडी वने : ज्या भागांत ६०० ते १०००
मिमी पर्जन्य होतो, अशा भागांत पर्जन्यमान कमी
असल्याने पाण्याची उपलब्धता कमी असते, अशा
वनातील वृक्षांची पाने विशिष्ट ऋतूत झडतात - गळून
पडतात. त्यामुळे वनांना पानझडी वने म्हणतात.
कोकण, सह्याद्रीच्या पूर्वेकडील कमी पावसाचा प्रदेश,
आणि
सातपुडा पर्वत, पठारावरील डोंगररांगा
राज्याच्या पूर्व भागात ही वने आढळतात. या वनात
साग, हिरडा, वड, पळस, सालई, मोह इत्यादी वृक्ष
आढळतात. महाराष्ट्राच्या वनक्षेत्रांपैकी बराचसा भाग
या प्रकारच्या वनांनी व्यापला आहे.

(४) झुडपी व काटेरी वने : ६०० मिमी पेक्षा
कमी पर्जन्य असलेल्या प्रदेशात प्रामुख्याने ही वने
आढळतात. या वनांतील वनस्पतींमधील पाण्याचे प्रमाण
कमी होऊ नये, यासाठी वनस्पतींची पाने लहान
असतात, तसेच त्या काटेरी असतात. पर्जन्यछायेच्या
प्रदेशात ही वने हमखास आढळतात. या वनांत बाभूळ,
बोर, निवडुंग, खैर इत्यादी वनस्पती आढळतात.

(५) खारफुटी वने : पश्चिम किनारपट्टीवरील
खाड्यांच्या भागात खारफुटीची वने आढळतात. ही
वने क्षारयुक्त मचूळ पाणी असलेल्या भागात आहेत
या वनामुळे सागरकिनारपट्टीचे लाटापासून मोठ्या
प्रमाणावर संरक्षण होते. या वनस्पतींमुळे किनारी
प्रदेशातील जलचरांना आश्रय मिळतो.

प्राणी संपत्ति

महाराष्ट्रात सदाहरित व निम सदाहरित वनांत
वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, हत्ती, रानडुक्कर
इत्यादी प्राणी आढळतात, तर पानझडी वनांत तसेच
कमी पर्जन्याच्या प्रदेशांत हरिण, कोल्हे, लांडगे, तरस
हे प्राणी आढळतात. काटेरी वनांच्या भागात साळिंदर,
ससा, हरिण, तरस यादी प्राणी, तसेच सरपटणाच्या
प्राण्यापैकी विविध जाताचे सर्प आढळतात.
भारद्वाज, मोर, घुबड, सातभाई इत्यादी पक्षी
वनांमध्ये आढळतात. झुडपी व काटेरी वनांत माळढोक

हा पक्षी आढळतो. हा पक्षी आता दुर्मिळ होत आहे. पर्व
महाराष्ट्रात आढळणारा हरियाल (हिरवे कबुतर) हा
आपला राज्यपक्षी आहे. भीमाशंकर येथे आढळणारी
शेकरू ही मोठी खार आपला राज्यप्राणी आहे.
जंगलतोडीमुळे वनांचे प्रमाण कमी होत आहे.
त्यामुळे वन्य प्राणिजीवन धोक्यात आले आहे. प्राणी व
पक्षी यांचे संरक्षण व संवर्धनासाठी राष्ट्रीय उद्याने व
अभयारण्ये उभारून राज्याच्या वनविभागाने अनेक
प्राणी व पक्ष्यांना आश्रय दिला आहे.

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

केंद्रीय कार्यकारी मंडळ