वर्ण विचार
वर्ण विचार
वर्णविचार - आपल्या तोंडातून जे मूळचे ध्वनी निघतात त्यांना वर्ण म्हणतात. मराठी भाषेत एकूण ४८ वर्ण आहेत. त्यांना मूळाक्षरे असे ही म्हणतात. या वर्णाचे तीन प्रकार आहेत.१) स्वर
२) स्वरादी
३) व्यंजने
१) स्वर - ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसर्या वर्णाच्या सहाय्यावाचून होतो, त्यास "स्वर" असे म्हणतात, हे १२ स्वर आहेत, अ, आ, इ, ई. उ, ऊ, त्र. ल, ए. ऐ. ओ, ओ. (स्विर॒ हे पूर्ण उच्चाराचे असतात.)
२) स्वरादी - ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वरांचे सहाय्य घेऊन होतो, त्यास “स्वरादी” म्हणतात, हे उच्चार दोन आहेत,
अ5- > अं - अनुस्वार, अ 5 1: - अ: विसर्ग.
३) व्यंजने - ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या मागून सहाय्य घेऊन होतो, त्यांना व्यंजने म्हणतात. व्यंजनांचा उच्चार
स्वरांशिवाय लंगडा पडतो, उदा. (तू. कू, मू, इ.) स्वर व स्वरादी - हे व्यंजनात मिळून बारारवडी तयार होते.
उदा. कःअनरक, कृ्आसका, कृः्इ-किईइ.
व्यंजने एकूण 3४ आहेत. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत. कू, रवृ. गू. घृ. पासून ह, ळू. पर्यंतचे हे 3४ वर्ण स्वतंत्रपणे उच्चारता येत नाहीत. वर्णाचे भेद - मुरवाच्या ज्या भागापासून वर्ण उच्चरले जातात, त्या भागास त्या वर्णाची स्थाने म्हणतात.
१) कंठ्य - जे वर्ण कंठरथानातून उच्चारले जातात, त्यांना कंठ्य वर्ण असे म्हणतात. उदा. अ, आ, क वर्ग, ह, विसर्ग
हे कंठ्य वर्ण आहेत. (क वर्ग- क, खव, ग, घ, ड)
२) तालव्य - जे वर्ण तालुस्थानातून (टाळू) उच्चारले जातात, त्यांना तालव्य वर्ण असे म्हणतात.
उदा. इ, ई. च वर्ग, यू, श, हे तालव्य वर्ण आहेत. (यातील, चू. छ. जु. झु. या वर्णाचा उच्चार त्यांना य॒ लावून होणाऱ्या
उच्चारासाररवा होतो. उदा - चलन, छत्री, जल, झलक, या शब्दांतील च, छ. ज, झ़ या वर्णाचे
उच्चार चू य, छ5 यृझ्ू » य् असे होतात. (ववर्ग च. छ ज, झा. जञज)
३) मूर्धन्य - (टाळ्याला जीभ लावून ज्याचा उच्चार करावा लागतो किंवा होतो असा वर्ण) जे वर्ण मूर्धस्थानातून उच्चारले
जातात त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात.
उदा. क्र. टवर्गर्., षृ. ळ्. (टवर्ग-ट, ठ, ड, ढ, ण)
४) दंत्य - जे वर्ण दंतर्थानातून उच्चारले जातात, त्यांना दंत्य वर्ण असे म्हणतात.
उदा. लू, त वर्ग, लु. सू. हे दंत्य वर्ण होय. (तवर्ग-त, थ. द ध न)
५) ओष्ठय - जे वर्ण केवळ ओठांद्वारे उच्चारले जातात, त्यांना ओष्ठ्य वर्ण असे म्हणतात.
उदा. उ, ऊ, प वर्ग. हे ऑष्ठ्य वर्ण आहेत. (पवर्ग-प, फ, ब भर, म)
६) कंठतालव्य - जे वर्ण उच्चारण्यासाठी कंठस्थान व तालुस्थान या दोन्ही स्थानांचे सहाय्य घ्यावे लागते,
त्यांना कंठतालव्य वर्ण असे म्हणतात.
उदा. ए. ऐे. हे कंठतालव्य वर्ण आहेत.
७) कंठोष्ठ्य - जे वर्ण उच्चारण्यासाठी कंठ व ओठ या दोन्ही स्थानांचे सहाय्य घ्यावे लागते, त्यांना कंठोष्ठ्य
वर्ण असे म्हणतात.
उदा. ओ, ओ हे कंठोष्ठ्य वर्ण आहेत.
८) दंतोष्ठ्य - जे वर्ण उच्चारण्यासाठी दात व ओठ या दोन्ही स्थानांचे सहाय्य घ्यावे लागते, त्यांना दंतोष्ठ्य वर्ण असे म्हणतात.
उदा. “व” हे दंतोष्ठ्य वर्ण आहे.
९) दंततालव्य - जे वर्ण उच्चारण्यासाठी दात व तालू या दोन्ही स्थानांचे सहाय्य घ्यावे लागते, त्यांना दंततालव्य वर्ण असे म्हणतात.
उदा. चू. छ जु. झू. हे दंत तालव्य वर्ण आहेत. (या वर्णाचा उच्चार त्यांना “अ” लागून होणार्या उच्चारासाररवा होतो.
चूक, चाकू, जमीन, झाड, इ. अशा वर्णाचे उच्चार आहेत)
(वः्अ,छज्अ, जूर अ, झू अ असे उच्चार होतात)
वर्णांचा तक्ता -
पहिला प्रकार - (तालव्य वण) - संस्कृत मधील-चरित्र, चाचा, चार. चहा, वाचन, विचार, चतुर, चंद्र, चक्र, चिमणी, चारदा,
चाळीस, चेत्र, जागृती, जंगली, जग, जन, जळ, विजय, जयंती, झक्क, झलक, झकास, झब्बू छावा.
(या वर्णांचा उच्चार त्यांना “यू लागून होणार्या उच्चारासाररा होतो) उदा. चूज्यूः् अ-च्य जृज्यूज्अ ज्य.
दुसरा प्रकार - (दंत तालव्य) - चमचा, चोर, चारा, चाकू, वणे, चूक, चव, काच, चाल, पाच, चुरमुरे, चोच, चकती, चररवा,
जाई. जुई. जमीन, जकात, जरीकाठी, जावक, जावई, जड, जाणे, झाड, झगडा, झटपट, झडप, झरा.
(या वर्णाया उच्चार त्यांना अ” लागून होणाऱ्या उच्चारा सारखा होतो.)